पालांदुरातील घटना : रुग्णालयात हलविलेपालांदूर : सांदवाळीतल्या मशरुम साथी खाल्ल्याने चार व्यक्तींना बाधा पोहचली तर दोघांनी साधा वास घेतल्याने उलटीचा त्रास सुरु झाला. बाधीतांना प्राथमिक उपचार आटोपून भंडारा येथे सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना काल सायंकाळच्या सुमारास पालांदूर येथे घडली.पालांदूर येथील सुरेंद्र सांगोये यांच्या सांदवाडीत पाच बाय पाच मध्ये दीड किलोचा अंदाजात मशरूम निघाले. सुरेंद्र सांगोळे अतिवेगाने बेत आखला. परंतु सांगोडेकडे गणपती पाठपुजा असल्यामुळे गृहिणीने विरोध केला. सुनेने आग्रह धरला. परंतु गणेश पूजेमुळे आज मशरूम शिजणार नसल्याचे सासूने स्पष्ट केले. त्यामुळे सर्वही मशरूम मित्र भाऊराव पाठककडे दिले. परंतुु पाठकाच्या गृहिणीलाही मशरूम नसल्याचे वाटल्याने त्यांनीही भावाकडे दिले व शेजारच्यांना सुद्धा दिल्या. भावाकडे बसल्यांनी सहज खाऊन पाहिले व नक्कीच मशरूमच असल्याचे सांगितले. शेजारच्या निर्वाण कुटुंबियांनीसुद्धा घरी नेऊन आधीच कच्चाच खाऊन पाहिल्या. अगदी एका तासात सर्वांना रक्ताच्या उलट्या सुरु झालय. धावपळ मचली. बाधीतांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार केले व लगेच सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविले. बाधीत रुग्णांत सुधीर निर्वाण, रुक्मा निर्वाण, मंजुषा निर्वाण, मयाराम सेलोकर (जेवनाळा) आहेत तर योगेश बावणे यांनी सहज उत्सुकतेपोटी साधा वास घेतला तरी उलटीचा त्रास झाला. (वार्ताहर)
मशरूम खाल्ल्याने चार जणांना विषबाधा
By admin | Updated: September 3, 2014 23:07 IST