शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांना मिळणार वीजजोडणी

By admin | Updated: August 21, 2015 00:15 IST

ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी.

चंद्रशेखर बावनकुळे : प्रत्येक उपविभागात होणार रोहित्र दुरुस्ती युनिटभंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी. वीज जोडणीचे अर्ज ग्रामपंचायत, तलाठी, वायरमन, कृषि सहाय्यक यांच्याकडे उपलब्ध करुन शेतकऱ्यांच्या घरी जावून अर्ज भरुन घ्या, असे आदेश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महावितरण व महापारेषणशी संबंधित जिल्ह्यातील अडचणी व तक्रारी जाणून घेण्यासाठी व जिल्ह्याचा ऊर्जा कृती आराखडा तयार करण्यासाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला खासदार नाना पटोले, आ.रामचंद्र अवसरे, आ.बाळा काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, महापारेषणचे संचालक (प्रकल्प) ओमप्रकाश येम्पाल, महावितरणचे मुख्य अभियंता प्रसाद रेशमे, महापारेषणचे मुख्य अभियंता मिलींद बहादूरे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, जिल्ह्यात एकही शेतकऱ्यांचा कृषिपंपासाठीचा अर्ज प्रलंबित राहू नये, याची खबरदारी घ्यावी. तलाठी, कृषी सहाय्यक, लाईनमन व अभियंता यांची समिती स्थापन करुन त्यांच्यामार्फत कृषी पंपाच्या वीज जोडणीचे सर्वेक्षण करुन अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करा. जिल्हाधिकारी कृषी ऊर्जा करणावर नियंत्रण ठेवतील. डिमांड भरलेल्या १,७३५ शेतकऱ्यांना डिसेंबरपर्यंत जोडणी द्यावी. अर्ज केला पण डिमांड दिले नाही आणि त्याकाळात शेतकऱ्याने आत्महत्या केली तर संबंधित अभियंत्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. वीज वितरणासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असून इन्फ्रा-२ या योजनेमध्ये जिल्ह्याला ४४ कोटी रुपये देण्यात आले आहे. मागील पाच महिन्यांपासून ही काम सुरु करण्यात आली असून एप्रिल २०१६ पर्यंत पूर्ण होईल. बेरोजगार अभियंते आणि आय.टी. आय. युवकांसाठी बेरोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. यामधून बेरोजगारांना कामे उपलब्ध करुन देणार आहे. राज्यात दोन हजार मेगावॅट वीज शिल्लक असूनही पारेषण व वितरण व्यवस्था मजबूत नसल्यामुळे ग्राहकांना भारनियमानाचा फटका बसत आहे. त्यामुळे वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात १,५०० कोटीची योजना आखली आहे. त्यातून भंडारा जिल्ह्याला १५० कोटी देण्यात येणार येईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)आता गाव व शेतीसाठी वेगळे फिडर शेती आणि गावातील विजेचा भार वेगवेगळा करण्यासाठी गावठाण फिडर लावण्यात येणार आहे. दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेमध्ये ३२ कोटी रुपयांची तरतूद केली असून शेती आणि गावासाठी वेगवेगळे फिडर उभारण्यात येतील. त्याचबरोबर कोणतेही गाव सिंगल फेजींगमध्ये ठेऊ नये, अशाही सूचना त्यांनी दिल्या. रोहित्र दुरुस्तीसाठी स्वतंत्र युनिट रोहित्र खराब झाले किंवा जळाले तर त्या भागातील वीज पुरवठा खंडीत राहतो. रोहित्राची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी प्रत्येक उपविभागाला रोहित्र दुरुस्ती युनिट सुरु करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. रोहित्राअभावी वीज पुरवठा खंडीत राहू नये म्हणून १०० नवीन रोहित्र उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले. भंडारा, तुमसर, पवनीत भूमिगत योजना वादळ व पावसामुळे खांब व वीज तारा तुटून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडतात. उघडया वीज तारांमुळे शहरांचे सौंदर्य विद्रुप होते. त्यामुळे सर्व शहरांमध्ये भूमिगत वीज वितरण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर व पवनी या शहरांसाठी भूमिगत वीज वितरण योजनेमधून २० कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जातील.भंडारा व गोंदियासाठी मुख्य अभियंताआतापर्यंत नागपूरला मुख्य अभियंत्यांचे पद होते. काम सुटसुटीत व्हावे यासाठी भंडारा, गोंदिया व गडचिरोली या तीन जिल्ह्यासाठी गोंदिया येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरु करण्यात येणार आहे. महिनाभरात मुख्य अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.