साकोली येथे कार्यक्रम : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचा पुढाकारसाकोली : साकोली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथे आठ दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी अ.शि. रंगारी, प्रा.संजय डोंगरे, आर.एल. चौधरी यांचे व्याख्यान झाले असून प्रमुख अतिथी म्हणून अॅड.वामनराव खोब्रागडे, बी.एन. रामटेके, जी.एन. राऊत, हरी शहारे, बी.बी. राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डी.एस. रामटेके, प्रा.दयाल भोवते यांनी मार्गदर्शन केले. आणि परिसंवादाचे आयोजनही करण्यात आले होते. बौद्ध समाजाच्या समस्या व उपाय या विषयावर तुळशीदास गेडाम, ग्यानचंद जांभुळकर, राकेश भास्कर आदींनी मार्गदर्शन केले. प्रश्नमंजुषा व वर्क्तृत्व स्पर्धा व एकपात्री नाट्यप्रयोग बौद्ध धम्माची शिकवण व युवकांची जबाबदारी या विषयावर घेण्यात आले. महिला शिबिर धम्म कार्यात महिलांचे योगदान या विषयावर प्रमुख वक्ते स्नेहा बौद्ध यांनी मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कल्पना सांगोडे, ज्योती कान्हेकर आदी उपस्थित होत्या. संचालन साधना रामटेके व आभार जयश्री भास्कर यांनी मानले. एकपात्री नाट्यप्रयोग व बुद्ध भीम गायन स्पर्धा घेण्यात आली. एकपात्री नाट्यप्रयोगात प्रथम क्रमांक प्रशांत शहारे, द्वितीय केवळराम उके, तृतीय क्रमांक शीतल रंगारी तर बुद्ध भीम गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक वृक्षवल्ली तागडे, द्वितीय क्रमांक के.एस. रंगारी, तृतीय क्रमांक अपर्णा राऊत यांनी घेतले. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम स्नेहा राऊत, द्वितीय प्रवीण वाढई तर तृतीय प्रमिला बडोले तसेच वर्क्तृत्व स्पर्धेत प्रशिक्ष हुमणे तर द्वितीय प्रशांत शहारे तर तृतीय प्रविण वाढई यांनी यश संपादन केले. बक्षिस वितरण व समारोप सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अॅड.वामनराव खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.नेपाल रंगारी, मदन रामटेके, प्रा.डी.ई. रामटेके, प्रा.शंकर बागडे, डी.जी. रंगारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धेत ज्यांनी यश संपादन केले त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील गावातील बौध्द बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)
आठ दिवसीय धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव
By admin | Updated: October 23, 2016 01:05 IST