शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्प परिसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: August 1, 2016 00:14 IST

महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल ....

तीन वर्षांपासून पावसाचा फटका : समस्या कायमप्रकाश हातेल  चिचाळमहाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पामुळे पूर्व विदर्भातील शेतीचे रुपांतर हरितक्रांती होईल असे भाकीत अनेक नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करुन गोसेखुर्द प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. परंतू तिन चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील गोसे, चिचाळ, पाथरी, सौंदळ, आकोट, वासेळा आदी गावात दुष्काळदृष्य परिस्थिती निर्माण होवून शेतकऱ्यांच्या पिकांची अपरिमित हानी झाली असल्याने अनेक शेतकऱ्यांनी विचार व्यक्त केले.गोसे खुर्द प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर असून जल साठवणीला चार वर्षापासून प्रारंभ झाला. त्याचा फायदा गोसे खुर्द प्रकल्पाच्या २५ किलोमिटर अंतरावरील शेतीला मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांची उन्नती झाली आहे. पण गोसे खुर्द प्रकल्पाला लागून असलेल्या १० किमी परिसरात तिन ते चार वर्षापासून सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस पडत असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची शेती पिकत नाही. २०१४ मध्ये गोसे, चिचाळ येथे योग्य प्रमाणात पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांचे पऱ्हे तसेच राहुन रोवणी होवू शकली नाही.गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवणे सुरु झाले. आणि या परिसरातील समस्यांना सुरुवात झालेली आहे. वैनगंगा नदीला नागपूरचे नागनदीचे अतिशय घाणरडे पाणी येवून मिळत असल्याने प्रकल्पातील पाणी दुषीत झाले असुन दुर्गंधी युक्त झाले आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना श्वास घेणे कठीण झाले आहे. यामुळे भविष्यात अनेक रोगांना सामोरे जावे लागु शकते. तरी यावर संबंधितांनी कोणती तरी उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.सदर प्रकरणी काही भूगोल तज्ञाशी चर्चा केली असता धरण क्षेत्रात बाष्पीभवन होत असल्याने दमट वातावरण निर्माण होवून त्या भागात ढग निर्माण होतात. परंतु हे ढग दुसरीकडे वाऱ्यामार्फत वाहुन नेले जातात. त्यामुळे सदर परिसरात अत्यअल्प पाऊस पडून दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. मात्र याचा फटका गेल्या चार वर्षापासून गोसे खुर्द प्रकल्पाच्या परिसरातील लोकांना बसत आहे. सदर परिसरातील समस्या क्षेत्रातील पुढाऱ्यांनी शासन दरबारी मांडून शासनाच्या लक्षात आणून दयावे अशी मागणी गोसे खुर्द परिसरातील जनतेनी केली आहे. याकडे शासन प्रशासन गांर्भियाने लक्ष देणार काय? असा सवाल आहे.