शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद विसरुन ग्रामविकासासाठी पुढे या!

By admin | Updated: October 8, 2016 00:33 IST

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सर्व घटकांनी आपसातील मतभेद विसरुन पुढाकार घ्यावा ...

सामाजिक, कृतज्ञता पुरस्कार : प्रदिप बुराडे यांचे आवाहनविरली (बु.) : गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावातील सर्व घटकांनी आपसातील मतभेद विसरुन पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य प्रदिप बुराडे यांनी केले. ते स्थानीक गांधी मैदानावर आयोजित सामाजिक कृतज्ञता पुरस्कार वितरण सोहळयात बोलत होते.येथील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळाच्यावतीने गावाचा नावलौकीक वाढविण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळयाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे माजी अध्यक्ष अन्नाजी बेदरे हे होते. अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. ईश्वर नंदपुरे, जि.प. सदस्य प्रदिप बुराडे, केवळराम पटोले, हरिभाउ घोसेकर, पंचायत समिती सदस्य नेहा बगमारे, पंचशील धान गिरणी मासळचे अध्यक्ष भुमेश्वर महावाडे, शंकरराव हुमने, माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बेदरे, घनशाम राउत, हरिश्चंद्र बुराडे, डॉ. संभाजी चुटे उपस्थित होते. यावेळी बुराडे म्हणाले, मागील ५० वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळाने समाजाला अनेक हिरे दिलेले आहेत. आणि ते आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करुन देशाच्या प्रगतीसाठी झटत आहेत. मंडळाचे हे व्यासपीठ सर्वांना मोठे करणारे असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी किसन भेंडारकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सामाजिक कृतज्ञता पुरस्कार सेवानिवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर बुराडे, माधव चुटे, शालिनी चुटे, बुधराम भुते, नीळकंठ मेंढे, प्रा. कामराज रामटेके, शंकरराव हुमने, बळीराम पवनकर, गणेश बगमारे, राजू आत्राम, पांडूरंग सोंदरकर, जगन मेश्राम, घनशाम राउत, भगवान आत्राम, आबाजी चुटे, रामकृष्ण मेश्राम, सुधाकर पारधी, कमलाबाई चुटे, अरुणा बन्सोड, कमलताई मुंडले, कामुना बन्सोड, कांताबाई हुकरे, रेवाताबाई ब्राम्हणकर, तंमुसचे अध्यक्ष हरिश्चंद्र चुटे, माजी सरपंच ताराचंद चुटे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर महावाडे, वानमराव बेदरे, भुमेश्वर महावाडे, गुंडेराव बागडे, शिवाजी ब्राम्हणकर, एकनाथ भेंडारकर, हरिश्चंद्र डहाके, चिंतामन वकेकार, प्रकाश सुखदेवे, डॉ. ईश्वर नंदपुरे, विनायक बेदरे, केवळराम पटोले, वामन कोरे, रामाजी वकेकार, श्रावण आत्राम, हरिभाउ घोसेकर, बाबाजी महावाडे यांचा समावेश होता. सत्कारमुर्तीना शाल, मानचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. प्रास्ताविक उध्दव कोरे यांनी केले. संचालन दीपक बागडे यांनी तर आभारप्रदर्शन दामोधर बागडे यांनी केले. कार्यक्रमासाठी मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)