शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत फटाक्यांमुळे होते प्रदूषणात वाढ

By admin | Updated: October 30, 2016 00:32 IST

दिवाळीचा आनंद फटाक्याशिवाय साजरा करता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. मात्र क्षणिक आनंदासाठी आपण लाखमोलाच्या पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत,...

दिवाळी आज : प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनभंडारा : दिवाळीचा आनंद फटाक्याशिवाय साजरा करता येत नाही, अशी अनेकांची भावना असते. मात्र क्षणिक आनंदासाठी आपण लाखमोलाच्या पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत, या सत्याचा प्रत्येकाला विचार करण्याची वेळ आली आहे. दिवाळीच्या काळात घातक फटाक्यांमुळे वातावरणातील प्रदूषणात अनेक पटींची वाढ होत असल्याचे सर्वेक्षणात समोर येत आहे. भंडारा जिल्ह्यात हे प्रमाण कमी असले तरी येत्या काही वर्षात महानगरातील प्रदूषणाचा टक्का गाठेल, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.फटाक्यांच्या निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात बारूदचा वापर केला जातो. आतषबाजी आणि आवाज अधिक व्हावा यासाठी काही जड धातूंचाही समावेश केला जातो. पर्यावरण तज्ज्ञांच्या माहितीनुसार, फटाके फोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात कॅडमियम व शिशे या धातूंचे उत्सर्जन होते, जे अतिशय धोकादायक आहे. याशिवाय वातावरणात कॉपर, झिंक, सोडियम, पोटॅशियम अशा नष्ट न होणारे रसायनिक तत्त्वांचे उत्सर्जन होते. हे धातू वातवरणात फिरत राहतात. हे प्रमाण मानवी आरोग्याच्या दृष्टिने घातक ठरते. यामुळे दमा, डोकेदुखी, रक्तदाब वृद्धी, त्वचा रोग व डोळ्यांचे आजार वाढतात. दमा आजाराच्या रूग्णांना तर दिवाळीच्या काळात घराबाहेर पडणेही मुश्किल ठरते. वायु प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणाचा स्तरही वाढतो. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज असलेल्या फटाक्यांवर बंदी आणली आहे. मात्र सर्रासपणे या नियमाचे उल्लंघन केले जाते. या ध्वनीमुळे माणसच नाही तर प्राण्यांनाही आघात सहन करावा लागतो. (शहर प्रतिनिधी)चिमण्याही होतात गायबदिवाळीच्या काळात शहरात चिमण्यांचे प्रमाण कमी होते. याशिवाय कुत्रे आणि मांजराच्या वास्तव्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी जागरूक होऊन इको-फ्रेंडली आणि फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. लोकल फटाक्यांना चिनी ‘बार'!चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध लावण्यात आले असताना या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात चोरून विक्री होत आहे. हे फटाके विक्रीस सुलभ व्हावे यासाठी त्याच्यासारखे दिसणारे बनावट फटाके बाजारात आले आहेत. विशेषत: पटक बॉम्ब (पॉपपॉप) हा फटाका मोठ्या प्रमाणावर विकला जात आहे. दिवाळी हा जल्लोष, उत्साहाचा सण. परंतु या पावित्र्याला चिनी फटाक्यांचे गालबोट लागले आहे. या फटाक्यांमध्ये पोटॅशियम परक्लोरेटची मात्रा जास्त असल्याने या फटक्यांचा कधीही धोका होऊ शकतो. यामुळेच चिनी फटाक्यांच्या विक्रीवर निर्बंध आहे.बाजारपेठा हाऊसफुल्लदिवाळी म्हणजे अंधारावर मात करून आनंदाचा प्रकाश आणणारा सण. यंदा दिवाळीत नवा उत्साह, नवा जल्लोष, नवी आशा, नवा हुरूप दिसत आहे. महागाई वाढली असली तरी त्याची कुठलीही छाया दिवाळीच्या खरेदीवर पडली नसल्याचे चित्र बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे.