शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

कंत्राटदाराविरुद्ध गुन्हे दाखल प्रकरण मजुराच्या मृत्यूचे

By admin | Updated: May 11, 2014 00:01 IST

सिपेवाडा येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असताना मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररीत्या जखमी झाला.

दोन जणांना अटक, धुर्वे कुटुंबीयांना मदतीची गरज

लाखनी : सिपेवाडा येथे नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू असताना मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररीत्या जखमी झाला. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी चकोले कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेश हिरामन चकोले रा. पांढराबोडी, जितेंद्र तुकाराम वैद्य रा. वडेगाव, ता.मोहाडी, राजेंद्र परसराम सूर्यवंशी रा.भंडारा यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांविरुद्ध भादंवि ३०४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. यापैकी जितेंद्र वैद्य व राजेंद्र सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली असून त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रात्री १० वाजताच्या सुमारास लाखनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव व ठाणेदार जयवंत चव्हाण यांनी भेट दिली. आज सकाळी ७.३० वाजता सिपेवाडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबातील कर्ता मुलगा गमावल्यामुळे आई गंगाबाई व पत्नी माया यांच्यावर संकट कोसळले आहे. मृतकाच्या कुटुंबाला अद्याप बांधकाम विभागाच्या अधिकार्‍याने भेट दिलेली नसून कोणतीही आर्थिक देण्याविषयी आश्वस्तही केलेले नाही. सिपेवाडा येथे गावाजवळील नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. माती खोदण्याचे काम जेसीबीद्वारे सुरू आहे. दि.९ ला सायंकाळच्या सुमारास मनोहर धुर्वे या मजुराचा मातीच्या ढिगार्‍याखाली दबून मृत्यू झाला. मोहन शेंडे रा.रोहणा हा मजूर गंभीररित्या जखमी झाला. सदर कामाचे कंत्राट भंडारा येथील चकोले कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे आहे. बांधकाम सुरु करताना कामाबद्दलची माहिती असणारे फलक लावण्याची गरज आहे. परंतु पुलाच्या बांधकामाच्या ठिकाणी माहितीचे फलक नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही नियमाचे पालन केले नाही. जनतेच्या जाण्यासाठी रपटा तयार केला आहे. त्यावरही कोणतीही सुचना नाही. सर्वसामान्य लोकांसाठी सदर पुलाचे बांधकामाचे ठिकाण धोकादायक ठरणारे आहे. कंत्राटदार व बांधकाम अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे एक मजुराला प्राण गमवावा लागला. या घटनेचा तपास उपनिरीक्षक बरैय्या करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)