शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

धरणाची नऊ वक्रद्वारे उघडली

By admin | Updated: July 4, 2016 00:20 IST

जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे.

प्रकाश हातेल  चिचाळजिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने प्रकल्पात जलसाठा वाढला आहे. गोसेखुर्द धरणाची नऊ वक्रद्वारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहे. दूषित पाणी वाहून जाण्यात मदत मिळत आहे. दरम्यान प्रकल्पावर पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. भंडारा येथील वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी ५ मीटरवर आहे. महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी गोसे खुर्द प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असून गेल्या चार वर्षापासून जलसाठवणूकीला प्रांरभ झाला आहे. मात्र प्रकल्पाचा डावा कालवा व उजवा कालव्याचे काम संथ गतीने चालू असून बांधकामात निकृष्ठ दर्जाचे झाल्याने कालव्याचे बांधकाम तोडून नव्याने कामे सुरु असून त्या प्रकल्पातील जलसाठ्याचा मात्र कालव्याच्या कंत्राटदाराच्या निकृष्ठ बांधकामाचा प्रकल्प पुर्ण होवूनही पाणी साठवून नदीला सोडावे लागत आहे.पूर्व विदर्भातील भंडारा चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या गोसे खुर्द प्रकल्पाला २६ फेब्रुवारी २००९ ला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा असलेला हा महाराष्ट्रातील एकमेव प्रकल्प असून प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्रफळ ३४८६२ वर्ग किलोमीटर सरासरी वार्षिक पर्जन्यमान १३२०.८० मिली लिटर, २२२५८ हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे. सांडव्याची लांबी ९०४ मीटर सांडव्याची वक्रद्वारे ३३ नग, १८.३ मीटर बाय १६.५० मीटर महाराष्ट्रातील सर्वात मोठे वक्रद्वारे आहेत. एका वक्रद्वाराचे वजन २५० मेट्रीक टन, सांडवा विसर्ग क्षमता ६७३०० घनमीटर प्रती सेकंद, धरणाची एकूण साठवण क्षमता ११४६ दशलक्ष घन मीटर, जिवीत साठा ७४० दशलक्ष घनमीटर मृतसाठा ४०६ दशलक्ष घनमीटर आहे.प्रकल्पाला डाव व उजवा उसे दोन कालवे असून डावा कालव्याची लांबी २३ किलोमीटर विसर्ग ४५ घनमीटर/ सेकंद, उजवा कालवा लांबी १०७ किलोमीटर विसर्ग ११३ घनमीटर/ सेकंद आहे. पावसाळ्याला प्रारंभ झाला असून जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नसल्याने व प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असले तरी डावा कालवा व उजवा कालव्याच्या निकृष्ठ बांधकामाने कालव्याचे बांधकाम तोडून पुन्हा बांधकाम कासवगतीने सुरु आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडण्यास विलंब होत आहे. राजकीय, सामाजिक संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांना निवेदने देवून कालव्यात पाणी सोडण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे कालव्यावर व प्रकल्पावर पर्यटकांची संख्या वाढणार आहे, हे निश्चित.