विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड : राहुल द्विवेदी यांचे प्रतिपादनंभंडारा : १२ वी चे वर्ष हे आयुष्यातील अत्यंत महत्वाचे वर्ष असून करिअरचा तो पाया आहे. त्यामुळे करिअरला दिशा देणाऱ्या या महत्वपूर्ण टप्प्यावर आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करा आणि त्या ध्येय प्राप्तीकरिता आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवाव, यश आपणास नक्कीच मिळेल, असा करिअर सक्सेस मंत्र भंडारा जिल्हा परिषदेचे सीईओ राहुल द्विवेदी यांनी नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना दिला.मार्च २०१४ च्या एचएससी परीक्षेत नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले घवघवीत यश पीएमटी व पीईटी परीक्षेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेले उत्तम रॅँकिंग आणि याच पार्श्वभूमीवर धिरुभाई अंबानी फाऊंडेशन कडून स्कॉलरशीप करिता विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांचे झालेले नामांकन या पार्श्वभूमीवर विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.महाविद्यालयातील प्रथम क्रमांकाने आलेल्या उत्तरा इंगळे, द्वितीय रसिका भोंगाडे व तृतीय क्रमांकाने आलेल्या मृणाल मोहाडीकर यांचे ग्रामविकास समिती शहापूर द्वारे प्रत्येकी ५ हजार, तीन हजार व दोन हजार रोख व स्मृतीचिन्ह देऊन कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी द्विवेदी यांच्याहस्ते गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे या तिन्ही विद्यार्थ्यांना पदवीकरिता वैद्यकीय शाखेत तर प्रवेश मिळालाच परंतु भारतातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या धिरुभाई अंबानी फाऊंडेशनच्या स्कॉलरशीप करिता सुद्धा या तिन्ही विद्यार्थ्यांचे नामांकन झाले आहे हे विशेष.या सत्कार समारोहप्रसंगी गुणवत्ता प्राप्त विद्याथ्योच्या पालकांचा सुद्धा सत्कार अतिथींच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामविकास समिती शहापूरचे उपाध्यक्ष मुकुंद फेंडारकर, कार्यवाह दर्शनलाल मलहोत्रा, उपकार्यवाह आनंद खोब्रागडे, अशोक तिरबुडे, मुख्याध्यापक विनोद गोलीवार, वर्षा दक्षिणकर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.जेकब यांनी केले तर संचालन मनिष मोहरील व आभार हलमारे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)
सातत्यपूर्ण परिश्रम हेच यशाचे गमक
By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST