भंडारा : पूर्वी विवाह सोहळा म्हटला की लगीनघाई. वऱ्हाड्यांची धावपळ. यासह लग्न विधीसाठी करावा लागणारे सोपस्कार पार पाडण्यासाठी फार मोठी धावपळ व्हायची. परंतु दोन परिवारांना एकत्र आणणाऱ्या या विवाह सोहळ्याचे स्वरूप आता काळानुरूप बदलत चालले आहे. विवाहाच्या तयारीपासून दिल्या जाणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला पंगतीतील मेनूपर्यंत कालपरत्वे आमुलाग्र बदल होताना आता दिसत आहे.पूर्वी लग्नपत्रिका छापून घरातील भाऊबंध मंडळी, आप्तेष्ट, स्रेहीजण व नातेवाईक यांना प्रत्यक्ष घरी जावून महिला वऱ्हाडी असल्यास त्यांना जाण्यायेण्याचे प्रवासभाडे देण्याची प्रथा होती. परंतु आजच्या आधुनिक व तज्ज्ञानाच्या युगात यासर्व गोष्टींना फाटा देवून अतिशय धावपळीचा हा सोहळा व्हॉट्स अॅप, हाईक, ट्यूटर, ई-मेल, आॅनलाईन पत्रिका आणि इव्हेंट मॅनेजमेंटमुळे हायटेक होत चालला आहे. ग्रामीण भागात छोटेखानी विवाह सोहळे, आदर्श विवाह, मुलगी पहावयास गेले अन् लग्न उरकून आले अशाप्रकारचे विवाह सोहळे होत असले तरी शहरांमध्ये हायटेक विवाह सोहळ्यालाच तरूणाईची जास्त पसंती दिसत आहे. लग्नविधीच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी हळदीचा कार्यक्रम गवरण्याचा नेम, गोपाळ मुहूर्त, गोरज मुहूर्त, सायं मुहूर्त असे विविध टप्पे विवाह सोहळ्यात असतात. महिला वऱ्हाडी प्रामुख्याने हळदीच्या कार्यक्रमावर भर देताना दिसतात. काही ठिकाणी तर रात्री हळदीच्या कार्यक्रमावर भर देताना दिसतात. काही ठिकाणी तर रात्री हळदीनंतर गाण्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. गरिबातील गरीब व्यक्तीदेखील लग्न सोहळ्यात फोटोग्राफी व व्हीडीओ शुटींगवर खर्च करताना दिसतात. श्रीमंत लोकांमध्ये विवाह सोहळ्याच्या करिडमा अब्लमसाठी अधिक पसंती दिली जात आहे. तद्वतच विवाहात नवरदेवांमध्ये सूट, सफारी या पेहरावाला आता पसंती न देता शेरवानी आणि इण्डोवेस्टर्न फॅशनच्या कपड्यांच्या ट्रेंडला महत्व देताना दिसत आहे. यातही शेरवानी, सेमी शेरवानी, धोती कुर्ता, ओतपुरी, डिझायनर सुट या वेशभूषेचा लग्न सोहळ्यामध्ये समावेश असल्याचे दिसून येते. नवरदेवासोबतच वधंूमध्ये देखील आता मालिकांचा व चित्रपटांचा चांगलाच प्रभाव दिसत असून त्यामध्ये सधा वेट, ब्रासो वेलवेट असा विशिष्ट प्रकारच्या डिझायनर साड्यांना पसंती दिल्या जात आहे. ३ हजारापासून ते १५ हजारापर्यंतच्या साड्यांची रेंज भंडारा बाजारपेठेत उपलब्ध असून सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या वधूची देखील महागड्या साड्यांना पसंती दिल्या जात आहे.तरूण पिढीकडून अशाप्रकारचे नवीन ट्रेंड वापरले जाते. लग्नपत्रिकेतून जनजागृती करता येईल. इथपासून गरिबांना भोजन देण्यापर्यंतच्या पद्धती अवलंबिण्यात येत आहेत. (प्रतिनिधी)
पारंपरिक विवाह सोहळ्यांचा बदलतोय ट्रेंड
By admin | Updated: April 11, 2015 00:36 IST