शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

अन् विद्युत प्रवाहाच्या स्पर्शाने त्याचा घात...

By admin | Updated: February 21, 2015 00:45 IST

तो आपल्या कुटूंबासह नविन दिवसाचे स्वागत करण्यासाठी भल्या पहाटेच उठला. दिवसभराचे

हृदयशून्य मानवता : कुटुंबावर काळाचा आघात, विजेच्या जिवंत प्रवाहाला स्पर्श झाल्याने गेला बळीप्रशांत देशाई ल्ल भंडारातो आपल्या कुटूंबासह नविन दिवसाचे स्वागत करण्यासाठी भल्या पहाटेच उठला. दिवसभराचे नियोजन करून त्याची मनात खुणगाठ बांधून तो कुटूंबासह घराबाहेर पडला. नियतीला मात्र त्याचा सुखीसंसार बघवत नव्हता. अनेकदा त्याच्यावर काळाने झेप घेतली व तो त्यातून सुखरूप बाहेर पडला. आज काळ बनून आलेल्या जिवंत विद्युत तारांनी त्याला आपल्या कवेत घेतले. यात तो तडफडला. परंतू, त्याला वाचविण्यासाठी कुणीही धजावला नाही व यातच त्याने जगाचा निरोप घेतला. ती काळरूपी वेळ होती सकाळी ९.३० वाजताची. मानव असो की पशुपक्षी सर्वांना देवाने सुंदर जीवन दिले आहे. आयुष्यात सर्वांना सुख मिळतेच असे नाही. काहींना आयुष्यभर संघर्ष करुनही यश मिळविता येत नाही, तर काहींच्या पायाशी लक्ष्मी लोळण घालते. दोन पैसे कमविण्यासाठी सर्वचजण जीवाचा आटापिटा करतात. भल्यापहाटे उठून कामाला लागतात व आपल्या कुटूंबाचा चरितार्थ चालवितात. कुटूंबाचा गाडा हाकण्यासाठी अख्ख कुटंूबच घराबाहेर पडून सर्वांना हातभार लावलात. ही स्थिती असते प्रत्येक मानवांच्या घरात. तर पशुपक्षीही मानवापेक्षा मागे नाहीत. मनुष्य बोलून दाखवितात तर पशुपक्ष्यांना वाचा नसल्यामुळे ते बोलू शकत नसले तरी त्यांच्या विशिष्ट शैलीत एकेमेकांशी संवाद साधतात. पहाट झाली की, जशी मनुष्याला आपल्या कुटूंबाच्या खाण्यापिण्याची चिंता असते तशीच परिस्थिती पशुपक्षांमध्येही असते. अशाच विवंचनेत आज शुक्रवारी सुर्यनारायणाच्या स्वागतासाठी ‘हे’ कुटूंबही भल्यापहाटे उठले. घरातील कर्त्याने उर्वरीत सर्वांना उठवून दैनंदिन सोपस्कार पार पाडले. व सुर्याचे तेजोमय किरण अंगावर घेऊन सर्वच कुटूंबाने मोठ्या आनंदात स्वागत करून दिवसभराच्या कार्यासाठी सर्वच घराबाहेर पडले.मात्र, त्यांच्या सुखी जीवनाला वाईट नजर लागली होती. आनंदात एक-एक मजल दरमजल समोर जात असताना नियतिने त्यांच्यासाठी वेगळेच काहीतरी आखले होते. याची पुसटशीही कल्पना या कुटूंबाला नव्हती. शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा परिषदे समोरून गेलेल्या विद्युत विभागाच्या जिवंत तारांवर काळ ‘त्या’ कुटूंबाची वाट बघत होता. याची कल्पना नसलेल्या त्या कुटूंबावर काळाने झडप घातलीच. जिवंत विद्युत तारांना स्पर्श झाल्याने कुटंूब प्रमुख असलेला ‘तो’ चिपकला. तसाच तो किंचाळला. यामुळे परिसरातील नागरिकांना काही कळायच्या आत तो तारांपासून दुर फेकल्या गेला. तो जमीनीवर पडून तडफडत राहिला. मात्र, उपस्थित नागरिकांनी त्याला मदतीचा हात देण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतली. दरम्यान त्याचे कुटूंबीयांनी अशा परिस्थितीत मदतीच्या किंचाळ्या मारल्या. पण तिथे उपस्थित असलेल्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतल्याने कुटूंबीय हतबल झाले होते.एखादी महिला किंवा तरूणीवर कुठलाही अनर्थ घडला असता किंवा अपघात झाला असता तर याच मानवांनी धावून तिला मदतीचा हात दिला असता. परंतू, ‘तो’ जीवाच्या आकांताने ओरडून प्राण वाचविण्यासाठी किंचाळत होता. मात्र, तो मनुष्य नसून मूक ‘माकड’ असल्यामुळे उपस्थितांनी मदतीचा हात दिला नाही. मनुष्य असो की, पशुपक्षी कोणावरही संकट ओढविले तरी मदतीचा हात देणे गरजेचे आहे. मानवालाच मदत करणे हे मानव धर्माचे कर्तव्य नसून पशुपक्ष्यांनाही मदत करणे गरजेचे आहे. यात ‘त्या’ माकडाची काय चूक, त्याला जर मानवासारख कळले असत तर तो इथून त्याने उड्या मारल्या नसत्या. पायदळ चालून निर्धारित ठिकाणी पोहचला असता. देवाने मनुष्य व मुक्या प्राण्यांमध्ये यासाठीच हा भेद ठेवला आहे. जर ‘माकडाला’ वेळीच मदत मिळाली असती तर त्याचे प्राण वाचले असते. मात्र, तिथे उपस्थित हृदयशुन्य मानवाला त्या मुक्या माकडाची काय पर्वा.