राजू बांते मोहाडीआम्रवृक्षाच्या सानिध्यात आले की त्या भोवताल आम्र बहराचा मंद सुगंध मन प्रसन्न करते. आम्रवृक्षाच्या कक्षात जाताच थोडा अल्पकाळ थांबल्यावाचून राहत नाही. अशा या आम्रराईच्या बहराने सारा परिसर सुगंधाने दरवळू लागलाय.कोणत्याही मार्गाने जा, एकतरी आम्रवृक्ष पडतोच. आम्रवृक्षाबाजूने जा नाही तर त्या वृक्षाच्या खालून जा. आंबेबहराचा मंद असा सुगंध हवाहवासा वाटतो. पुढे जाण्याच्या आधी त्या आम्रवृक्षाच्या बहराकडे नजर गेल्यावाचून राहत नाही. त्याला वेगळे कारण आहे. या वर्षी आंब्याच्या सर्वच झाडांना प्रचंड प्रमाणात बहर आल्याचे दिसत आहे. आंब्याची पाने त्या बहराने झाकून गेली आहेत. शिवरात्रीच्या एक आठवड्याअगोदर आऊस पाऊस झाला. त्यामुळे काही प्रमाणात आम्रबहर जमीनदोस्त झाला. तरीही आजच्या स्थितीत आमराईमधील आंब्याची झाडे बहराने फुलून गेल्याचे दिसत आहे. पुढील काळात हवा तुफान मोठ्या प्रमाणात आला नाही. अवकाळी पाऊस झाला नाही तर बहराने फुललेल्या आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात फळ येवू शकतात. हवामानाचा अंदाज लक्षात घेता शिवरात्री झाल्यानंतर वातावरणात फार मोठा बदल होत नाही. म्हणजेच या वर्षी आंब्याच्या वृक्षांना येणारा बहर विक्रमी आहे. बहर गळून पडला नाही तर प्रचंड प्रमाणात आंब्याचे पीक येणार आहे. मागील वर्षी अनेक झाडांना बहरच आलेला नव्हता. त्यामुळे गावरान आंबे महागले होते. लग्नकार्यात आमटी खायला मिळाली नव्हती. आज आम्रवृक्षाच्या बहराची स्थिती लक्षात घेतली तसेच आंब्याच्या पिकाची प्राथमिक अंदाज लक्षात घेता आंब्याचे उत्पादन अधिक होईल. गावागावात आंब्याचे उत्पादन खूप झाले तर नक्कीच आंब्याचे भाव उतरून आंबे स्वस्त होणार आहेत.आमराया झाल्या दिसेनाशादोन अडीच दशकापूर्वी खासगी आमराया बघायला मिळत होत्या. काही सरकारी जागेवर एका ठिकाणी दहा पंधरा आम्रवृक्ष दिसून येत होते. आज त्या आमरायांचे दृष्य बघणे दुर्लभ झाले आहे. आमरायाच्या ठिकाणी शेती केली जात आहे. गावरान आंब्याचे पीक आले की त्याला भाव मिळत नव्हता. खुशालपणे दुसऱ्यांना आंबे तोडण्याची मुभा होती. पण सगळे चित्र आज बदललेले आहे. आमराया नष्ट झाल्या. उत्पादन आंब्याचे कमी होत आहे. काही हौशी शेतकरीच शेती मोडून आम्रबाग लावल्याचे दिसत आहेत. पण ज्या शेतात मोडक जून, नवीन आम्रवृक्ष आहे. त्या आंब्याच्या झाडांना फळे अधिक येणार आहेत. उन्हाळ्यात आता थंड पाण्याने तहान भागविण्यापेक्षा आंब्याच्या रसाने मन प्रसन्न केले जाणार आहे. कच्च्या कैऱ्या खाणाऱ्यांना या वर्षी पर्वणी लाभणार आहे.
आम्रबहराचा सुगंध दरवळू लागला सर्वत्र
By admin | Updated: February 19, 2015 00:33 IST