सहा गावात तलाव नाही : नियमित पाणी द्यातुमसर : भारनियमनाच्या मुद्दयावरून पाच गावातील शेतकऱ्यांनी आमदारांना काल सोमवारी घेराव घातला. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा करण्यात आली. तुमसर तालुक्यातील उमरवाडा, बोरी, कोष्टी, बाम्हणी, माडगी व पिपरा या गावात साधा मालगुजारी तलाव नाही. बारमाही वाहणारी वैनगंगेचा फायदा येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना मुळीच होत नाही, बावनथडी प्रकल्पाची कामे रखडलेली आहेत. शासनाच्या निर्देशानुसार केवळ आठ तास पाण्याचा उपसा विहिरीतून व अन्य जलाशयातून करण्याचे फर्मान आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जाऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वाेच्च न्यायालयाने तशा सूचना राज्य सरकारांना दिल्या आहेत. तालुक्यात वीज वितरण कंपनीकडून एक आठवडा दिवसा व एक आठवडा रात्री विजपुरवठा करण्याचे वेळापत्रक जारी केले आहे. सकाळचे वेळापत्रकात सलग आठ तासाऐवजी केवळ सहाच तास विज पुरवठा केला जातो. तांत्रिक बिघाड हे कारण येथे पुढे केले जाते तर रात्री १२.३० पासून सकाळी ८.३० पर्यत वीजपुरवठा दुसऱ्या आठवड्यात होते. रात्री वीज सुरू करण्याकरिता बांधावर कसे जावे असा प्रश्न या गावातील नागरिकांनी आ. अनिल बावनकरांना केला. सरसकट सकाळ पाळीतच आठ तास वीज पुरवठा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कृषीपंपधारक शेतकऱ्यांची मीटर रिडींग सहा सहा महिने घेतली जात नाही. सरासरी बिल दिले जाते. बांधावर येथील कर्मचारी जात नाही. पिपरा येथील एका शेतकऱ्याला १९ हजार युनिटचे बिल देण्यात आले. सिंचन सुविधा नसलेल्या गावात १५ ते २० दिवस केवळ सकाळी ८ तास देण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा आमदारांना घेराव
By admin | Updated: August 26, 2014 23:15 IST