शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

अतिरिक्त भूसंपादनाने ५०० कोटींचा भुर्दंड

By admin | Updated: December 23, 2014 22:59 IST

विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

भंडारा : विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी काही जमिनींचा मोबदला देण्यात आला असून अनेक शेतकऱ्यांनी मोबदला घेण्यासाठी नकार दिला आहे. तथापि चुकीचे सर्व्हेक्षणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होऊन शासनावर सुमारे ५०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. परिणामी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी शेतकरी आणि जमिनमालकांनी पत्रपरिषदेत केली.विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे बाधीत क्षेत्र अर्धा मिटरने वाढविल्याचे दर्शवून तब्बल १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन अधिग्रहीत करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यापैकी काही जमिनींचा मोबदला देण्यात आला असून अनेक शेतकऱ्यांनी मोबदला घेण्यासाठी नकार दिला आहे. तथापि चुकीचे सर्व्हेक्षणामुळे हजारो शेतकरी भूमिहीन होऊन शासनावर सुमारे ५०० कोटी रुपयांचा भुर्दंड बसत आहे. परिणामी प्रकल्पाच्या बाधित क्षेत्राचे फेरसर्व्हेक्षण करण्याची मागणी शेतकरी आणि जमिनमालकांनी पत्रपरिषदेत केली.गोसेखुर्द प्रकल्पातील धरणाच्या जलशयाची महत्तम पातळी २४५.५ मीटर इतकी निश्चित करण्यात आली आहे. शासन आणि विभागाच्या तांत्रिक अहवालानुसार ही पातळी गृहीत धरून बाधीत क्षेत्रातील जमिनीचे संपादन करावयाचे होते. जलाशयाचे बॅकवॉटर जोपर्यंत पोहचेल त्यानुसार बाधितक्षेत्र ठरवून अधिग्रहण करणे गरजेचे होते. मात्र गोसेखुर्द प्रकल्पाच्या अभियंत्यांनी धरणाच्या जलाशयाची पातळी २४६ मीटर दर्शवून त्यानुसार शेतजमिनीची मार्किंग करीत संपादनाची कारवाई केली. भंडारा व पवनी तालुक्यातील १९३ गावांमधील सुमारे १८ हजार एकर अतिरिक्त शेतजमीन प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात समाविष्ट झाली. २४५.५ मीटर पातळीचा आधार घेऊन शेतजमीन संपादित करावयाची असताना अर्धा मीटरने पातळी अधिक दर्शवून अतिरिक्त २० टक्के जमिन संपादित करण्यात आली. सिंचन विभागाच्या निकषानुसार ज्या गावातील ७५ टक्के शेतजमीन आणि घरे बाधित होतात त्याच गावाचे अन्यत्र पुनर्वसन करण्यात येते. परंतु शेती आणि घरे अंशत: बाधित होत असलेल्या गावांचेही पुनर्वसन करण्यात येत असून शेतकऱ्यांना विस्थापित केले जात असल्याचा आरोप आहे. अशा गावांच्या पुनर्वसनाकरिता दुसरीकडे जागा संपादित करण्यापासून ते पुनर्वसन कामासाठी सरकारी तिजोरीवर कोट्यवधीचा भुर्दंड बसल्याचे यावेळी सांगण्यात आले. काही शेतजमीनी बाधीत होत असल्याचे नोंद गोसेखुर्द पुनर्वसन विभागात असून या कार्यालयातर्फे तसे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र बाधीत क्षेत्र म्हणून त्याच गटाची नोंद भूसंपादन कार्यालयात आहे. गोसे विभागाने तयार केलेल्या नकाशानुसार काही गटातील शेतजमीन अंशत: बाधीत होत असल्याचे दर्शविण्यात आले असले तरी संपूर्ण गट बाधीत दाखवून अधिग्रहीत करण्यात आले आहे. अतिरिक्त संपादित करण्यात आलेल्या जमिनीचे फेरसर्व्हेक्षण करण्यात यावे, बाधीत क्षेत्रात येत नसलेल्या जमिनी मोकळ्या करून त्यांची खरेदी विक्री करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. प्रशासकीय स्तरावर निर्णय न झाल्यास न्यायालयात याचिका टाकणार असल्याचे महादेव मेश्राम, धनंजय मुलकलवार, विनोद बांते, केवळराम वाढई, सुनिल बांते, पद्माकर पनके, वामन पंचबुद्धे व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)