लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची भंडारा जिल्ह्यात परिणामकारक अमलबजावणी सुरु आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अभियानात जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड सहभागी झाले आहेत. त्यात भंडारा पंचायत समिती ३०८ वॉर्ड, मोहाडी २३७, तुमसर ३०९, लाखनी २२२, साकोली १९६, लाखांदूर १९५, पवनी २४० अशा वॉर्डाचा समावेश आहे.१ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा अभियान राबविण्यात आले. यातून व्यापक प्रमाणात जनजागृती झाली. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता स्पर्धा सुरु झाली. गटविकास अधिकाºयांच्या मार्गदर्शनात ग्रामपंचायत स्तरावर स्थानिक तपासणी समिती गठीत करण्यात आली. या समित्या आपला अहवाल नोव्हेंबर महिन्यात सादर करणार आहेत. त्यातील उत्कृष्ठ ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गावात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण झाली.उत्कृष्ट वॉर्डाला दहा हजाराचा पुरस्कारया स्पर्धेअंतर्गत उत्कृष्ठ ठरलेल्या वॉर्डांना रोख दहा हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. तसेच त्या वॉर्डातील कुटूंबांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. यानंतर जिल्ह्यातील सर्व जिल्हापरिषद गटातील ग्रामपंचातींसाठी स्पर्धा आयोजित करण्यात येईल. जिल्ह्यातील ५२ गटातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या ग्रामपंचायतीला ५० हजार रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे.
स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:56 IST
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. याच स्पर्धेत जिल्ह्यातील ५४१ ग्रामपंचायतीचे १७०७ वॉर्ड सहभागी झाले असून १ आॅक्टोबरपासून सुरु झालेल्या या स्पर्धेची तपासणी अंतीम टप्प्यात आहे. यात उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना आणि जिल्हा परिषद गटाना पुरस्कार दिले जाणार आहे.
स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्ह्यातील १७०७ वॉर्ड
ठळक मुद्दे५४१ ग्रामपंचायती : उत्कृष्ट ग्रामपंचायती व गटांना पुरस्कार