शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

७० टक्के मीटर निघाले डिफॉल्टी

By admin | Updated: September 30, 2016 15:30 IST

भालचंद्र येडवे , लातूर लातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त्

भालचंद्र येडवे , लातूरलातूर परिमंडळाच्या महावितरण कंपनीकडून बसविण्यात आलेल्या एकूण साडेचार लाख मीटरपैकी तब्बल ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ त्यामुळे महावितरणने आत्तापर्यंत ११६८९ मीटर ग्राहकांना बदलून दिले आहेत़ आलेल्या तक्रारीनुसार अन्य मीटरची तपासणी सुरू आहे़ लातूर परिमंडळाअंतर्गत जिल्ह्यात सुमारे साडेचार लाखांच्या आसपास वीज ग्राहकांची संख्या आहे. महावितरण कंपनीकडून पूर्वीचे जुने मीटर बदलून नव्याने इलेक्ट्रॉनिक्स मीटर बसविण्यात आले आहेत. मात्र मीटर फॉल्टीमुळे बील अव्वाच्या सव्वा येवू लागले़ परिणामी, महावितरण कार्यालयात अनेक ग्राहकांनी तक्रारी नोंदविल्या आहेत़ या तक्रारीनुसार जुलै महिन्यात ६३, आॅगस्ट महिन्यात ७३, सप्टेंबर महिन्यात १०९, आॅक्टोबर महिन्यात ७९, नोव्हेंबर महिन्यात १०३, डिसेंबर २१६, जानेवारीत १५८, फेब्रुवारी १५९, मार्च १४५ आणि त्यानंतर महिन्याला सरासरी शंभर ते दीडशे मीटरची टेस्टींग करण्यात आली़ असता त्यातील ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ सद्याही बील जास्त येत असल्याने तक्रारींचा ओघ ग्राहकांकडून सुरूच आहे़ त्यामुळे महावितरणने आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मीटरची टेस्टींग सुरू केली आहे़ टेस्टींगमध्येही ७० टक्के मीटर डिफॉल्टी निघाले आहेत़ टेस्टिंग झालेल्या आणि डिफॉल्टी निघालेले मीटर बदलून देण्याची कार्यवाही महावितरणने सुरू केली आहे़ काही मीटर बदलूनही दिले आहेत़जुलै २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत टेस्टींग झालेले ७० टक्के मीटर फॉल्टी निघाले आहेत़ या दरम्यान, अडीच हजाराच्या आसपास तक्रारी होत्या़ त्यानुसार महावितरणने मीटरची टेस्टींग केली असून, ११६८९ मीटर आतापर्यंत बदलून दिले आहेत़ सध्याही महावितरणकडे हजारो तक्रारी आहेत़ या तक्रारीनुसार मीटरची टेस्टींग सुरू आहे़ ज्या मीटरमध्ये फॉल्ट आहे ते मीटर बदलून दिले जात असल्याचे महावितरणचे कार्यकारी अभियंता मदन सांगळे यांनी सांगितले़ महिन्याकाठी सरासरी १६० मीटर टेस्टिंगला येतात. पैकी ७० टक्के मीटर टेस्टिंग केल्याअंती डिफॉल्ट निघाल्याचे आढळून आले़ जुलै व आॅगस्ट महिन्यात चुकीच्या बिलासंदर्भात ५०, वीज मीटर मिळत नाही म्हणून ३० रजिस्टर तक्रारी आल्या असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले़