शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
2
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
3
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
4
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
5
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
8
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
9
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
10
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
11
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
12
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
13
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
14
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
15
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
16
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
17
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
18
डॉक्टरांची खुनाच्या गुन्ह्यांतून झाली सुटका; कोर्ट म्हणे, स्वसंरक्षण हा मूलभूत अधिकार
19
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
20
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा

बीड जिल्ह्यात ‘सायबर’चा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 00:21 IST

बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे. पिन नंबर सांगा.. असे कोणी विचारत असेल, तर सावधान! हा फोन बँकेतून नसून तो आपली आर्थिक फसवणूक करण्यासाठी असू शकतो. अशावेळी आपली गोपनीय कसलीच माहिती फोनवर देऊ नये. उलट तात्काळ पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा आणि गुन्हेगारांविरूद्ध आवाज उठवा. कारण मागील तीन वर्षात बीड जिल्ह्यात ३८ गुन्ह्यांची नोंद असून, यामध्ये सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असल्याचे समोर आले आहे. गुन्हे घडण्यापूर्वीच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा विळखा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बीड : बँकेतून मॅनेजर बोलतोय. एटीएम बंद होणार आहे. पिन नंबर सांगा.. असे कोणी विचारत असेल, तर सावधान! हा फोन बँकेतून नसून तो आपली आर्थिक फसवणूक करण्यासाठी असू शकतो. अशावेळी आपली गोपनीय कसलीच माहिती फोनवर देऊ नये. उलट तात्काळ पोलीस किंवा बँकेशी संपर्क साधा आणि गुन्हेगारांविरूद्ध आवाज उठवा. कारण मागील तीन वर्षात बीड जिल्ह्यात ३८ गुन्ह्यांची नोंद असून, यामध्ये सर्वाधिक आर्थिक फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे पोलीस ठाण्यांमध्ये नोंद असल्याचे समोर आले आहे. गुन्हे घडण्यापूर्वीच नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांचा विळखा पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आॅनलाईन बँकिंग, आॅनलाईन खरेदी, मेसेजिंग, ई-गव्हर्नस, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, टिष्ट्वटर, व्हिडिओ कॉल यामुळे जगाच्या कानाकोपºयातील लोक अगदी जवळ आले आहेत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला. त्यामुळे ‘करलो दुनिया मुठ्ठी में’ हे वाक्य येथे बरोबर लागू होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या हाती मोबाईल असतो. मोबाईल व इतर ठिकाणी वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारीची पाळेमुळेदेखील अधिक दूरवर पोहोचली असल्याचे दिसून येते.

माहिती तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे दैनंदिन व्यापार तसेच इतर अनेक व्यवहार करणे लोकांना सोयीस्कर झाले असले तरीही त्याचबरोबर त्यातील गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे.हॅकींगच्या माध्यमातून पैशांचे व्यवहार, तसेच अनेक प्रकारे आर्थिक फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह छायाचित्रे, प्रक्षोभक संदेश पाठवणे यासारख्या गुन्ह्यांची नोंद सायबर क्राईममध्ये करण्यात येते. गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत सायबरचे ३८ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये आॅनलाईन फसवणुकीसह लॉटरी लागल्याचे सांगून, बनावट एटीएम वापरून, तुम्हाला बक्षीस लागल्याचे सांगून फसवणूक झाल्याच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. बीडमध्ये आर्थिक फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे.

बीडच्या सायबर विभागात पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेश टाक, शेख सलीम, अनिल डोंगरे, संतोष मेहेत्रे, शेख आसेफ, विकी सुरवसे आदी कार्यरत आहेत.भामट्यांना पकडणे अवघडसायबर गुन्ह्यांमध्ये संबंधितांना पकडणे खूप कठीण असते. ज्या खात्यावर पैसे टाकले जातात, ते खातेदेखील तात्पुरत्या स्वरूपाचे तयार केले जाते. दिवसाचे टार्गेट पूर्ण झाले की, ही मंडळी आपले बस्तान दुसरीकडे हलवतात.एखाद्याची फसवणूक झाल्यास त्याला त्याची रक्कम मिळणे गरजेचे असते. त्यामुळे फसवणूक झाल्यानंतर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या गुन्ह्यांत शिक्षा १०० टक्केइतर गुन्ह्यांमध्ये फिर्यादी किंंवा साक्षिदार फुटीर होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा तसे होतेही. पण या सायबर गुन्ह्यांमध्ये असे होत नाही. जरी झालेच तरी पोलिसांकडे तांत्रिक पुरावे खुप मजबूत असतात. त्यामुळे संबंधित गुन्हेगाराला १०० टक्के शिक्षा होतेच. बीडमध्ये शिक्षाची माहिती समजली नाही.पोलीस अधीक्षक कार्यालयात मार्गदर्शनपोलीस अधीक्षक कार्यालयात मंगळवारी सायबर गुन्ह्यांच्या संदर्भात जनजागृती कार्यशाळा घेण्यात आली. तज्ज्ञ मयूर लोमटे यांनी सविस्तर माहिती दिली.यावेळी उपअधीक्षा सुधीर खिरडकर, सुभाष चौरे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना खिरडकर यांनी उदाहरणांसहित उत्तरे दिली.