दुसरी लाट ओसरतेय, असं आपण म्हणू लागलो आहोत, पण ती लाट संपूर्णपणे ग्राऊंड झीरो लेव्हलला यायच्या आधीच तोवर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे की काय, अशी परिस्थिती वाटू लागली आहे, असे संतोष वाळके यांनी जनजागृती करताना सांगितले. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. लोणी-पिंपळा परिसरात काळजी वाटावी, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, व्हायरस आपले रूप बदलत आहे.
नवीन उपप्रकार समोर येत आहेत. दुसरीकडे लसीकरण ज्या गतीने व्हायला पाहिजे, त्या गतीने होत नाही. कोविडसंबंधित नियमांचे पालन होताना दिसत नाही. यामुळे कोरोना रुग्ण वाढत आहेत. लोकांच्या मनात लसीकरणाबद्दल समज, गैरसमज निर्माण झालेले आहेत, असे युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्याध्यक्ष युवराज खटके यांनी सांगितले. सुखदेव लोखंडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधाकरिता गावकऱ्यांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे, सामाजिक अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन केले. जनजागृतीदरम्यान प्रा. दादा विधाते यांनी समाजामध्ये ठिकठिकाणी कोरोना विषाणू कशाप्रकारे पसरतो, याचे मार्गदर्शन केले. या जनजागृतीत सरपंच बेल्हेकर रेणुका, विलास वाळके, मोहन पोकळे, अजिनाथ बेल्हेकर, गणेश पोकळे, भानुदास भोगाडे, सचिन सासवडे, अनिल भोसले, उत्तम वाळके, राजू शिंदे, कल्याण गुंड, रामेश्वर वाळके, संतोष गुंड, सोमनाथ भोगाडे आदी मान्यवर सहभागी झाले होते.
070721\avinash kadam_img-20210707-wa0092_14.jpg