कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक चणचण आता भूतकाळातील गोष्ट होईल. तुमची आर्थिक स्थिती स्थिर आणि मजबूत राहील. गेल्या वर्षी केलेल्या मेहनतीचे फळ या वर्षी मिळेल. तुम्ही चैन-विलास, सहली आणि सुट्ट्यांचा मनसोक्त आनंद घेऊ शकाल. काही नवीन आणि सुखद बातम्या तुमच्या वाट्याला येतील. या वर्षी कुंभ राशीच्या जातकांना आध्यात्मिक प्रगतीचा अनुभव येईल. ग्रहमान तुम्हाला दानधर्म आणि धार्मिक कार्यांकडे वळवेल. तुम्ही जेवढे धार्मिक कार्यात सहभागी व्हाल, तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक प्रगतीसाठी बारकाव्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची साधना हेच एकमेव ध्येय असेल. प्रवासातून समृद्धीचे मार्ग मोकळे होतील, त्यामुळे प्रवासाच्या संधी सोडू नका. वर्षाच्या मध्यंतरी कौटुंबिक समस्या किंवा उत्पन्नापेक्षा जास्त खर्च यामुळे चिंता वाढू शकते. संवेदनशील व्हा आणि परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. आरोग्याच्या बाबतीत पहिल्या तिमाहीत सावध राहा, कदाचित दवाखान्याची पायरी चढावी लागेल किंवा शस्त्रक्रियेचे योग येतील. निवासस्थान बदलण्याचा विचार असेल तर हे वर्ष अनुकूल आहे. कायदेशीर कटकटींमधून तुमची सुटका होईल आणि विजयाचे योग आहेत.