27 ऑगस्ट, 2025 बुधवारी आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज अवैध काम व नकारात्मक विचारां पासून दूर राहावे. खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल. आरोग्य बिघडेल. कुटुंबात खडाजंगी होईल. खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चणचण भासेल. ह्यातून सुटका करून घेण्यासाठी प्रयत्नशील राहावे.