Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२३: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 07:26 IST2023-04-17T07:25:40+5:302023-04-17T07:26:33+5:30
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२३: जुनी येणी वसूल होतील, कामात सफलता; विविध लाभांचा दिवस
- विजय देशपांडे (ज्योतिषविशारद)
मेष: विविध प्रकारचे लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील. महत्त्वाच्या कामात सफलता मिळेल: मात्र कामे करण्यासाठी दगदग करावी लागेल. आवडत्या खाद्य पदार्थाचा आस्वाद घेता येईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. नोकरीत प्रगती होईल.
वृषभ: नोकरीत कामाचा ताण राहील. नवीन संधी मिळतील. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे येतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील, भागीदारी व्यवसायात फायदा होईल.
मिथुन: पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यात आघाडीवर राहाल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. मुलांची प्रगती होईल. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. वरिष्ठांकडून शाबासकीची थाप पाठीवर पडेल.
कर्क: मनात काळजीचे विचार राहतील. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील. थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. कामे झालीच पाहिजेत असा अट्टाहास करू नका. प्रवास शक्यतो टाळा. वाहने जपून चालवा. आर्थिक आवक चांगली राहील. घरात वाद टाळा.
सिंह: मनात संमिश्र भावना राहतील. नोकरीत कामाचा ताण कमी राहील. सुखसोयी वाढवून मिळतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यवसायात कष्ट करण्याची गरज आहे. घराच्या सजावटीसाठी वेळ द्याल. महागडी वस्तू खरेदी कराल.
कन्या: इतरांच्या भानगडीत पडू नका. स्वतःहून कुणाला सल्ला देऊ नका. आपण भले की आपले काम भले असे धोरण ठेवा. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आरोग्याची काळजी घ्या. फार दगदग होईल अशी कामे करू नका. महत्त्वाच्या कामात अडचणी येतील.
तूळ: सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील. लोकांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करा. चांगल्या बातम्या कानावर पडतील. मुलांची प्रगती होईल. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. व्यवसायात वादापासून दूर राहा. काहींना प्रवास घडून येतील.
वृश्चिक: नोकरीत काँही बदल होऊ शकतात. त्यामुळे थोडा कामाचा ताण वाढेल. संयमाने कामे करण्याची गरज आहे. तुमचे महत्त्व लोकांच्या लक्षात येईल. घरी पाहुणे येतील वाद होणार नाहीत याची दक्षता घ्या. कुणाला जामीन राहू नका. मुले प्रगती करतील.
धनु: व्यवसायाच्या निर्मित्ताने फिरणे होईल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना तुमची गोपनीय माहिती देऊ नका. भावंडांशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मित्रांच्या संगतीत वाहवत जाऊ नका.
मकर: व्यवसायात यशस्वी वाटचाल सुरू राहील. जीवनसाथीची साथ राहील. आर्थिक व्यवहार जपून करा. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. घरात वाद होतील. शब्दाने शब्द वाढतात हे लक्षात घेऊन संयम बाळगण्याची गरज आहे. कलाकारांन प्रसिद्धी मिळेल.
कुंभ: आर्थिक प्राप्तीचे प्रमाण समाधानकारक राहील. देवाण घेवाण करताना काळजी घ्या. आपल्या अनेक अडचणी दूर होतील. भावंडांशी वाद टाळा. व्यवसायात कामाचा ताण राहील. नोकरीत अनुकूल घटना घडतील.
मीन: महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. कामानिमित्त दगदग होईल, परगावी जावे लागू शकते. अनावश्यक खर्च टाळा. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. उसने पैसे देताना विचार करून द्या. भावंडांशी सख्य राहील.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"