शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

जि.प. कर्मचारी युनियन पहिल्यांदाच रिंगणात

By admin | Updated: September 24, 2015 00:30 IST

स्थानिक शिक्षक सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपाला आहे. आतापर्यंत या बँकेवर १९ संचालक प्रतिनिधीत्व करीत होते.

अमरावती : स्थानिक शिक्षक सहकारी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपाला आहे. आतापर्यंत या बँकेवर १९ संचालक प्रतिनिधीत्व करीत होते. मात्र आगामी निवडणूक ही विभागस्तरावर होत असल्याने यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियन पहिल्यांदाच रिंगणात उतरणार आहे. परिणामी निवडणुकीचे वारे वाहू लागले असून शिक्षकांसोबतच आता कर्मचाऱ्यांमध्ये राजकीय वातावरण तापणार आहेत.शिक्षक सहकारी बँकेचे आतापर्यत कार्यक्षत्र जिल्ह्यापुरतेच मयादित होते. मात्र आगामी बँकेची निवडणूक ही विभागस्तरावर होणार आहे. अशातच बँकेचे संचालक मंडळ हे १९ वरून २१ एवढे करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण गटातून १५, ओबीसी मतदारसंघातून १, एसी मधून १, व्हीजेएनटीमधून १, महिला राखीवमधून २, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यामधून १ याप्रमाणे संचालक निवडून द्यावयाचे आहे. या निर्णयामुळे शिक्षक बँकेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद कर्मचारी युनियनला पहिल्यांदाच प्रतिनिधीत्व करण्याची संधी विभागस्तरावर उपलब्ध झाली आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने अनेक दिवसांपासून निवडणुकीसाठी जोरदार तयारी चालविली होती. यासाठी उमेदवार म्हणून अनेक कर्मचाऱ्यांनी दावेदारी ठोकली होती त्यामुळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियन मध्ये मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषद कर्मचारी युनियने सर्व पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची सभा बोलावून या विषयावर मंथन केले. यामध्ये पहिल्यांदाच प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्याने यासाठी समन्वयातूनच उमेदवार देण्याचे मत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. यावर प्रत्येकांची मते जाणून घेतल्यानंतर उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या समीर चौधरी, गजानन जुनघरे कडू आणि ज्ञानेश्र्वर घाटे या चार जणांची नावे चर्चेत होती. अखेर यामध्ये समीर चौधरी यांनी आपली दावेदारी मागे घेऊन ज्ञानेश्र्वर घाटे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब केला आहे. यावेळी सभेला कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने, समीर चौधरी, विजय कविटकर, प्रशांत धर्माळे, श्रीकांत मेश्राम, मंगेश मानकर, हृषीकेश कोकाटे, अमोल कावरे, संजय राठी, गजानन कोरडे, संजय येऊतकर, लीलाधर नाल्हे, प्रमोद ताडे, रूपेश देशमुख आदी कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)