अकोला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा वार्षिक युवा महोत्सव १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस चालणार्या या युवा महोत्सवात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी सांस्कृतिक आविष्कारांचे सादरीकरण करणार आहेत. शिवाजी महाविद्यालयाला युवा महोत्सवाच्या आयोजनाची दुसर्यांदा संधी मिळाली आहे. अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी १८ ते २१ सप्टेंबर असा चार दिवस युवा महोत्सव अकोल्यातील शिवाजी महाविद्यालयात रंगणार आहे. २00८ नंतर पुन्हा एकदा अकोला शहराला युवा महो त्सवाचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. अमरावती विभागातील अमरावतीसह अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यातील ३५0 महाविद्यालयांतील जवळपास ५ हजार विद्यार्थी २३ कलाविष्कारांचे सादरीकरण करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मूल्यमापन करण्यासाठी ६0 प्रज्ञावंत व अनुभवी परीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
आजपासून युवा जल्लोष!
By admin | Updated: September 18, 2014 02:22 IST