शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

यंदा व्यक्ती, जाती-केंद्रित निवडणूक

By admin | Updated: September 29, 2014 22:53 IST

आघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले.

गणेश वासनिक - अमरावतीआघाडी, युतीत ताटातूट झाल्यानंतर जिल्ह्यातील मतदारसंघांत सर्वच राजकीय पक्षांना उमेदवार निश्चित करताना घाम फुटला. राजकीय पक्षांना अन्य पक्षातील उमेदवार आयात करुन त्यांना ‘बी फॉर्म’ द्यावे लागले. त्यामुळे यापूर्वी कोण कोणत्या पक्षात होता, आता त्याने कोण्या पक्षाची उमेदवारी घेतली, हे मतदारांना कळेनासे झाले आहे. एकूणच ही निवडणूक व्यक्ती आणि जातीकेंद्रित झाल्याचे चित्र आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे, बसपा या प्रमुख पक्षांसह सामजिक संघटना, अपक्ष उमेदवारांची विधानसभा निवडणुकीत भाऊगर्दी झाली आहे. मतदारसंघात प्रभाव पाडणारे नेतृत्व विधानसभा निवडणूक लढवीत असल्याने मतदारही संभ्रमात आहेत. सरस उमेदवारांची मैदानात गर्दी होणार असल्याने मतदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. मात्र, ही निवडणूक सरतेशेवटी उमेदवारांचे व्यक्तीवलय आणि समाजाभोवती फिरणार असल्याचे संकेत आहे. इतर राज्यांत पार पडलेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फारसे यश आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारसंघांत उमेदवारांचे व्यक्तिगत हितसंबंध व समाजाचे प्राबल्य यावर बरेच काही अवलंबून राहील. प्रत्येक मतदारसंघात विशिष्ट समाजाचे प्राबल्य असल्याने तो समाज ज्या उमेदवारांच्या पाठीशी उभा राहील, त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जातो. यात पक्षाचेही मतदान महत्त्वपूर्ण ठरते. अमरावती, बडनेरा मतदारसंघात मुस्लिम, दलितांची मते निर्णायक राहतील. अमरावतीत परंपरागत देशमुख, पाटील व हिंदी भाषिकांचे वर्चस्व राहिले आहे. अचलपुरात माळी, दर्यापूर येथे पाटील, कोळी, बारी मेळघाटात पाटील, व्यापारी तर तिवस्यात धनगर, कोळी समाजाची मते निर्णायक मानली जाते. मोर्शीत माळी, आदिवासी तर धामणगावात पाटील, तेली व दलित मतांवर उमेदवारांची भिस्त आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना धक्का देण्यासाठी बसपाने अमरावती, अचलपूर, तिवसा येथून उमेदवार उभे केले आहेत. मात्र, बसपाचे उमेदवार फार प्रभाव पाडतील, असे तुर्तास तरी चित्र नाही. एक आॅक्टोबरपासून प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. प्रत्येक उमेदवार विशिष्ट समाजाची मते त्यांच्या बाजूने वळविण्यासाठी जातीय समीकरणे मांडणाच्या तयारीत आहेत. मैदानात उमेदवारांची भाऊगर्दी असली तरी त्या उमेदवारांच्या चारित्र्यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. उमेदवारांनी नाती-गोती, समाजाचे प्राबल्य कसे उपयोगी पडेल, याची जोरदार तयारी चालविली आहे.