शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
3
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
4
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
5
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
6
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
7
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
8
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
9
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
10
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
11
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
14
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
15
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
16
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
17
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
18
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
19
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
20
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

शेवटच्या शेतकऱ्याला मिळेल का प्रकल्पाचे पाणी?

By admin | Updated: October 10, 2015 00:37 IST

पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना ...

रबी हंगाम : दोन वर्षांपासून सतत पाण्यात कपात, आंदोलनाला तीन वर्षे पूर्णधामणगाव रेल्वे : पेयजल, सिंचन आणि नंतर उद्योगाकरिता प्रकल्पाचे पाणी आरक्षित केले जाते. असे असूनही अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी देताना दोन वर्षांपासून पासून कपात करण्यात येत आहे़ शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी कधी पोहोचणार, असा सवाल या भागातील शेतकऱ्यांनी केला आहे़ पाण्यासाठी शेतकऱ्यांनी तीन वर्षांपूर्वी आंदोलन छेडले. यंदा शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही तर लोकशाही पद्धतीने पुन्हा प्रशासनाशी दोन हात केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशा प्रतिक्रिया धामणगाव तालुक्यातील बोरगाव धांदे, हिरपूर, रायपूर कासारखेडा या भागातील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.चांदूररेल्वे या जुन्या विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब जाधव यांच्या कार्यकाळात अप्पर वर्धा प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली़ या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते १३ फेब्रुवारी १९६५ रोजी झाली़ १३ कोटी रूपयांच्या प्रशासकीय मान्यतेवरून १३ जुलै २००९ पर्यंत हा प्रकल्प १ हजार ३७४़६४ कोटींवर पोहोचला. ७०,१६९ हेक्टरमधील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती़ या प्रकल्पातून सिंचनाचा सर्वाधिक लाभ धामणगाव, चांदूररेल्वे तिवसा या तालुक्यांना मिळणे अपेक्षित होते़ धामणगाव, चांदूररेल्वे, तिवसा, मोर्शी, वरूड या भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे. विशेषत: अमरावतीकरांची तहान या पाण्याने भागवावी, असे स्वप्न त्यावेळी पाहिले गेले. मात्र, शेतीसाठी प्रकल्पातून पाणी मिळविण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांवर वेळोवेळी आंदोलने करण्याची वेळ आली आहे.तालुक्यातील स्थिती विदारक धामणगाव तालुक्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्प, धामणगावअंतर्गत विदर्भ शाखा धामणगाव घुसळी वितरिका, जळका वितरिका या वितरण प्रणालीतून १९९८-९९ पासून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी रबी हंगामात देणे सुरू केले़ त्यावेळी केवळ २३़१८ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत असल्याचे कागदोपत्री दाखविले जात असले तरी या तालुक्याची स्थिती अत्यंत वेगळी आहे़ अप्परवर्धेतून सोडलेले पाणी तब्बल सहा ते सात दिवसांनंतर शेवटच्या टोकावरील रायपूर, कासारखेड, भातकुली येथील शेतकऱ्यांना मिळते़ या पाण्याची उंची केवळ गुडघ्या इतकी असते़ गहू किंवा हरभऱ्याची पेरणी शेतकरी एकाच वेळी करीत असल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही़पाण्याचे महत्त्व कळणार कधी ?आठ वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांना अप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मिळत आहे़ यंदा अप्परवर्धाच्या कालव्यातून रब्बी पिकांकरिता १११ दिवस पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. शेतकरी वेळ असतानाच मागणीपत्र देत नसल्याने पाण्याचा लाभ घेत नाहीत. दरवर्षी पाणी सुटायच्या चार दिवसांपूर्वी मागणीपत्र संबंधित कार्यालयात दिले जाते. त्यामुळे प्रशासनाची नाहक धावपळ होते़ परिसरातील पाटचऱ्यांची साफसफाई केल्यानंतर जलदगतीने पाणी मिळेल, हे ही महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना पाण्याचे महत्त्व आताच कळले नाही तर अप्परवर्धा प्रकल्प भाग्यलक्ष्मी ठरण्याऐवजी केवळ पाणी पुरवठा करणारी यंत्रणा ठरेल, हे निश्चित. दोन वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यात कपातअप्परवर्धा प्रकल्पाचे पाणी मागील दोन वर्षांपूर्वी ३२७़२़९६ दलघमी इतके सोडण्यात येत होते़ त्यामुळे धामणगाव तालुक्यातील शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी सिंचनासाठी मिळत होते. परंतु आता या पाण्यात कपात करण्यात आली आहे़ २०२़़२०३ दशलक्ष घनमीटर पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोडण्यात येणार आहे़ त्यामुळे तिवसा, धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रपाळीत पाणी घ्यावे लागणार आहे़