अमरावती : बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चारचौघींत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. यासोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून असणंही मस्ट असतंच; पण नोकरी करून अर्थार्जन मिळवणारी बायको आता नवरोबासाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. कारण शहरात हाऊसवाईफ नव्हे, तर हाऊस हजबंडचे प्रमाण वाढल्याने नवरा-बायकोच्या नात्यात कटुता निर्माण होत आहे. पूर्वी गृहिणीचे म्हणजे चूल आणि मूल एवढय़ावरत र्मयादित होते. आता मात्र या गृहिणीचं स्वरूप बदललं आहे. अनेक घरांमध्ये नवरोबांवर चूल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे; मात्र अशातही बायकाच नोकरी आणि कुटुंब अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देत असल्याने, कुटुंबामध्ये काही प्रमाणात समतोल राहत आहे. एकाच वेळी आपल्या कामाच्या वेळा सांभाळायच्या, मुलांनाही वेळ द्यायचा. कुटुंबीयांकडेंही लक्ष पुरवायचे, शिवाय एकमेकांना समजूनही घ्यायचे या सगळ्या पातळ्यांवरची कसरत ते लीलया पार पाडत आहेत; परंतु काही नवरोबांचा यामुळे इगो दुखावत असल्याने त्यांच्या नात्यात दरार निर्माण होत आहे.
कामांची
घरातली
विभागणी कामं ही स्त्रियांनीच करायची, असा पूर्वी दृष्टिकोन असायचा; परंतु आता स्त्रिया नोकरीनिमित्त घराबाहेर पडत असल्याने दोघांमध्ये कामाची विभागणी केली जात आहे. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेदरम्यान स्त्रियांना नोकरीनिमित्त घराबाहेर पडावे लागते. त्यामुळे घरातील संपूर्ण कामे करण्याची जबाबदारी नवरोबांवर येत आहे. त्यामध्ये घर आवरणे, घासलेली भांडी जागेवर लावणे, मुलांचं आवरणे, निरनिराळी बिलं भरणे, बाजार आणणे, पाणी भरणे, मुलांना शाळेतून घरी आणणे, त्यांना जेवण देणे, भांडी घासून ठेवणे आदी कामे नवरोबांना करावी लागत आहेत. सकाळी ऑफिसला निघण्याच्या वेळेपर्यंंत जेवढे शक्य होईल तेवढी कामे स्त्रियाच करून ठेवतात; मात्र ऑफिसला गेल्यानंतर उर्वरित कामे नवरोबाला करावी लागतात.नवर्यापेक्षा
घरात
बायकोचा पगार अधिक दोघेही नोकरीला असतील अन् नवर्यापेक्षा बायकोचा पगार अधिक असेल तरीही दोघांमध्ये टोकाचे मतभेद होण्याची शक्यता असते. काही नवरोबा तर बायकोपेक्षा कमी पगार असल्याने थेट नोकरीलाच रामराम ठोकून दुसरी जादा पगाराची नोकरी शोधण्यात धन्यता मानतात. बायकोपेक्षा कमी पगार म्हणजे एकप्रकारे कमीपणाचे लक्षण समजले जात असल्याने दोघांपैकी एक तरी नोकरीला रामराम ठोकतो.