शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

१५० वर्गखोल्या पाडणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 22:24 IST

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ हजार ६६० शाळांमधील २५० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० वर्गखोल्यांचे आतापर्यंत निर्लेखन करण्यात आले असले तरी उर्वरित वर्गखोल्यांचे निर्लेखन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देचिमुकले धोक्यात : बांधकाम विभागाच्या निर्लेखन आदेशानंतरही अंमलबजावणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ तालुक्यांमध्ये ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या १ हजार ६६० शाळांमधील २५० वर्गखोल्यांच्या निर्लेखनास बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने १०० वर्गखोल्यांचे आतापर्यंत निर्लेखन करण्यात आले असले तरी उर्वरित वर्गखोल्यांचे निर्लेखन कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या नियंत्रणात ग्रामीण भागात सुमारे १६०० शाळा आहेत. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २५० वर्गखोल्या काही वर्षांपासून धोकादायक स्थितीत आहेत. अशा शिकस्त वर्गखोल्यांतूनच आजही विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळा मोडकळीस आल्या आहेत. शिकस्त वर्गखोल्यांची परिस्थिती ही दोन ते तीन वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. यामध्ये सन २०१६- २०१७ ते अद्यापर्यतच्या जिल्हाभरातील जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्या दुरुस्तीचे प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्य व शाळा व्यवस्थापन समित्यांच्या मध्यमातून गेले आहेत. काही शाळांमध्ये वर्गखोल्या शिकस्त असल्याने एकाच वर्गात दोन वर्ग भरविले जातात.विशेष म्हणजे, सन २०१८ ते २०२० या वर्षात शिक्षण विभागाकडे नवीन वर्गखोल्याचे बांधकाम, शाळा दुरुस्ती, संरक्षण भिंत, शौचालय बांधकाम आदी कामांसाठी प्रस्ताव आले आहेत. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडे प्रस्तावित कामांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधील शिकस्त वर्गखोल्या व इमारतीच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. ते सोडून शाळांना संरक्षणभिंत, पेव्हर यांसारख्या कामांचा आग्रहसुद्धा शाळा दुरुस्तीचे कामात अडचणीची बाब ठरत आहे.शाळांमध्ये वर्गखोल्या किंवा इतर कामे यामधील निकडीची कामे करणे आवश्यक आहे. परंतु, असे होत नसल्याने शिकस्त वर्गखोल्याचा मुद्दा निकाली काढणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, ज्या शाळांमध्ये १० वर्गखोल्या आहेत आणि पंधरा पटसंख्या आहे, अशा ठिकाणच्या चार खोल्या निर्लेखित केल्या आणि एकाच वर्गात दोन वर्ग भरले जातात, अशा ठिकाणी अनावश्यक वर्गखोल्याची बांधकामाची मागणीही अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले.धोकादायक वर्गखोल्यांचा तिढा सोडविण्यासाठी निकडीची कामेच प्राधान्याने घेतल्यास हा प्रश्न निकाली काढला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करणे तेवढेच महत्त्वाचे आहे.शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देशजिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या १४ पंचायत समित्यांमधील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त व धोकादायक असलेल्या इमारती, वर्गखोल्या आदीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना त्रिसदस्यीय समितीकडून नव्याने तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश शिक्षण व बांधकाम समितीचे सभापती जयंत देशमुख यांनी मंगळवारी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आर.डी. तुरणकर यांना दिले आहेत. जिल्हाभरातील धोकादायक असलेल्या वर्गखोल्या, इमारती व शाळांमधील अन्य निकडीची कामे याबाबत सर्व पंचायत समित्यांमधील गटशिक्षणाधिकारी, संबंधित केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक अशा त्रिस्तरीय समितीने शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन वास्तवदर्शी अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद आहे.निर्लेखनास पात्र वर्गखोल्याची संख्याजिल्हा परिषद शाळांमधील धोकादायक ठरत असलेल्या वर्गखोल्यांची संख्या २५० एवढी आहे. यामध्ये १४ तालुक्यांतील शाळांचा समावेश असून, तालुकानिहाय निर्लेखनास पात्र असलेल्या वर्गखोल्या चिखलदरा २१, नांदगाव खंडेश्वर ३१, भातकुली १८,मोर्शी १९, धामणगाव रेल्वे १२, चांदूर बाजार २९, तिवसा ७, दर्यापूर २४, धारणी १८, अमरावती २२, अचलपूर १३, अंजनगाव सुर्जी १५, वरूड २१ याप्रमाणे आहेत. यापैकी १०० खोल्यांचे निर्लेखन करण्यात आले आहे.शिक्षण विभागाकडे ग्रामीण भागातील शिकस्त वर्गखोल्यांचे निर्लेखन करण्याच्या प्रस्तावास बांधकाम विभागाने मंजुरी दिली. त्यानुसार कारवाई केली जात आहे. धोकादायक वर्गखोल्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्व शाळांची तपासणी, स्ट्रक्चरल आॅडिट यासह इत्थंभूत माहितीचा अहवाल मागविला आहे.- जयंत देशमुखसभापती, जि.प. शिक्षण