शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

नरबळीच्या घटनेमागे 'कौल' कुणाचा ?

By admin | Updated: August 23, 2016 00:48 IST

नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे

अमरावती : नरबळीचा जो गुन्हा पिंपळखुट्याच्या शंकर महाराज यांच्या आश्रम परिसरात घडला, त्या गुन्ह््यामागे मांत्रिकाकडून मिळालेला कौल, हे प्रमुख कारण असू शकते. पोलिसांनी त्या दृष्टीने तपास केल्यास या प्रकरणाची पाळेमुळे खणली जाऊ शकतात. सन १९७४ मध्ये मराठवाड्यातील मानवथ या गावी घडलेल्या नरबळी प्रकरणाचा अभ्यास केल्यास 'नरबळी' या विषयाने झपाटलेल्या गुन्हेगारांच्या मानसिकतेची अनेक पदरे लक्षात येऊ शकतात. या प्रकरणात तब्बल १० नरबळी देण्यात आले होते. यामध्ये १० वर्षांच्या पाच मुली, एक वर्षाचे बाळ आणि तिशीतील चार महिलांचा समावेश होता. नवऱ्याला श्रीमंत होण्यासाठी आणि त्याच्या पत्नीला मूलप्राप्तीसाठी देवाच्या कौलावरून हे नरबळी देण्यात आले होते. गावातील पिंपळाच्या झाडावर राहणाऱ्या मुंजाबाला ते अर्पण करण्यात आले होते. निरागस मुलींचे खासगी भाग कापून त्यातील रक्त मुंजाबाला अर्पण करण्यात आलेल्या नैवेद्यावर शिंपडले ेगेले होते. अत्यंत क्रूर पद्धतीच्या या नरबळी प्रकरणावर अमोल पालेकर यांनी 'आक्रीत' नावाचा मराठी चित्रपटही काढला आहे. त्यावेळी गाजलेल्या या प्रकरणात देवाने दिलेला कौल महत्त्वाचा होता. हा कौल मिळाल्यानंतरच इतका क्रूर गुन्हा घडला होता. कौल मिळाल्याशिवाय नरबळीच्या घटना घडत नाहीत, असे पुरावे उपलब्ध आहेत. कौल म्हणजे काय? ज्यांचा कर्मयोगावर विश्वास नसतो, आत्मविश्वास ज्यांनी गमावलेला असतो, अशी मंडळी त्यांना हवी असलेली भौतिक इप्सिते जसे- धन, गुप्तधन, अपत्ये, उच्चपद, पौरुषत्त्व आदी साधण्यासाठी अघोरी विद्येचा मार्ग स्वीकारला. या अघोरी विद्येत कुण्या एका देवाला खूश करण्यासाठी बळी द्यावा लागतो. हा बळी नेमका कसा हवा, हे देवाने दिलेला कौल हेरून कळते. यासाठी आवश्यक ती पूजा वा विधीची व्यवस्था मांत्रिक करतो. अर्थात् नरबळी देणारा आणि ज्याला नरबळी हवा त्या देवाच्या मधील दुवा हा मांत्रिक असतो. या मांत्रिकाशिवाय बळीची पूजा पूर्णत्वास जात नाही, अशी मान्यता आहे. पाटाचा कौल गोलाकार बुड असलेला गडू गव्हाच्या दाण्यांवर ठेवला जातो. गडूवर पाट ठेवला जातो. त्यावर मुलगा किंवा माणूस बसविला जातो. तो हातांच्या वजनावर बसतो. पाट हलला की कौल मिळाला, असे अंधश्रद्धाळू मानतात. पापी असल्यास पाट हलणार नाही, हे बसणाऱ्याला आधीच सांगितले जाते. अर्थात् तोदेखील अंधश्रद्धाळू असतो. पाटावर कुणी बसले की देवाला नाना प्रश्न विचारले जातात. बळी कुणाचा हवा? बकऱ्याचा की माणसाचा? मुलाचा की मुलीचा? कुमारिकेचा की विवाहितेचा? रक्त कुठले हवे? गळ्यातील की खासगी भागातील? प्रश्नांची सरबत्ती सुरूच असते. चिडून चिडून मांत्रिक प्रश्न विचारत असतो. कुठल्यातरी एका प्रश्नाला पाट फिरतो. आणि देवाने कौल दिल्याचे मानून तसा बळी देण्याची तयारी सुरू होते. तो दिलाही जातो. पाटामागे विज्ञान फिरणाऱ्या पाटामागे देवाची इच्छा नसून विज्ञान असते. बराच वेळ हाताच्या भारावर बसलेल्या मुलाच्या हाता-पायात मुंग्या आलेल्या असतात. प्रश्नांचा भडीमार सुरू असतो. पाप-पुण्याशी संबंध लावला जातो. तो कधीतरी किंचित हलतो. तो हलला की बिनबुडाचा गडू फिरतो. गडुवर ठेवलेला पाटही फिरतो. हे सारे वक्राकार गतीच्या नियमानुसार घडत असते. परंतु अंधश्रद्धाळू यालाच कौल मानून नरबळी देतात. कौल मिळविण्याचे याशिवाय आणखी वेगवेगळे प्रकार आहेत. प्रांतानुसार हे प्रकार बदलतात. मानवत प्रकरणातही कौल देणारा देव आणि कौल मिळवून देणारा मांत्रिक होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासंबंधी केलेल्या प्रदीर्घ अभ्यासाचाही निष्कर्ष हाच निघतो. नरबळीच्या घटनांचा उपलब्ध तपशील तपासल्यास ही तत्थ्ये समोर येतात. पिंपळखुट्याच्या घटनेतही कौल मिळवून देणारा मांत्रिक असेलच. त्याच्या इशाऱ्यावरून सुरेंद्रने हा गुन्हा केला असणार. मात्र तो दडलेला आहे. तो मांत्रिक शोधून काढणे आवश्यक आहे. तो कुठेही असू शकतो - आश्रम परिसरात, आश्रमाबाहेर वा राज्याबाहेर. तो जेरबंद न झाल्यास सुरेंद्रची जागा आणखी दुसरा कुणी घेईल. प्रथमेश, अजयच्या जागी तिसऱ्या कुणा निरागस मुलाच्या गळ्यावरून ब्लेड फिरेल.