शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

लोकप्रतिनिधींचे हेच का कर्तव्य?

By admin | Updated: August 23, 2015 00:27 IST

अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही.

गुंडांचा व्हावा सफाया : अचलपुरात रात्री १० वाजतानंतर शुकशुकाटअमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले हत्याकांडानंतर जिल्हा हादरला असला तरीही अद्यापपर्यंत पालकमंत्री किंवा खासदारांनी अमितच्या कुटुंबीयांची सांत्वना करण्याची तसदी घेतली नाही. दरम्यान, चार-पाच दिवसांपासून रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याने शहर रात्री १० वाजतानंतर सामसूम होत आहे. धागेदोरे कुठपर्यंत?अमरावती/अचलपूर : रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची हत्या ११ आॅगस्ट रोजी केल्यानंतर तालुका हादरला होता. खुनाला कारणीभूत असलेल्या बारूद गँगचा सफाया आता तरी व्हावा, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. 'लोकमत'ने प्रकरण रेटून धरल्यावर आरोपींचे अटकसत्र सुरू झाले. तथापि, पोलीस खाते, महसूल खाते आणि राजकीय मंडळी या गुंडांचा आपापल्या सोयीनुसार वापर करवून घेत असल्यामुळे लोकभावनेचा हवा तसा आदर करण्यात आला नाही. रेती तस्करांची पोलिसांनी कसून चौकशी केल्यास त्यांचे धागे कुण्या बड्या लोकप्रतिनिधीपर्यंत जुळलेले आहेत, हे उघड होईल. कासदपुरा, देवडी, गांधी पूल, चावलमंडी, उपजिल्हा रुग्णालयाजवळील दुकाने एरवी रात्री १२ वाजेपर्यंत उघडी रहात असे. कासदपुऱ्यातील चहापानाची दुकाने रात्री ३ वाजेपर्यंत उघडी रहात होती. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत कासदपुरा गजबजलेला असायचा. आता चित्र बदलले आहे. (प्रतिनिधी)खासदार अडसूळ यांना आम्ही हत्याकांडाची सर्व माहिती दिली आहे. ते दिल्लीला संसदेत अधिवेशनात व्यस्त आहेत. ते पुढील आठवड्यात बटाऊवाले यांच्या घरी भेट देणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून ते याची माहिती वेळोवेळी मागवत आहेत.- विनय चतूर, शिवसेना शहर प्रमुखपालकमंत्री पोटे येथे प्रत्यक्ष आले नसले तरी आम्ही या हत्याकांडाची माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली आहे.- अभय माथने, स्थानिक भाजपा नेते.गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जात आणि धर्म नसतो. त्यामुळे या प्रकरणाला जातीय रंग देण्यात अर्थ नाही. मात्र अमितच्या हत्या करणाऱ्यांना शासन झाले पाहिजे. या हत्येस महसूल विभागाचे काही अधिकारीही कारणीभूत आहे. त्यांचेवरही गुन्हे दाखल झाले पाहिजे. जनतेने संयम पाळावा.- बाळासाहेब वानखडे, नगरसेवक.यात्रा उत्साहात, शांतता कायमनागपंचमीनिमित्त शुक्रवारी सरायपुऱ्यातील श्रीकृष्ण पुलावर भरलेली यात्रा शांततेत व उत्साहात पार पडली. दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, असे पोलीस उपनिरीक्षक अजय आखरे यांनी सांगितले.पालकमंत्र्यांची भेट नाहीहत्याकांडाची घटना होऊन १० दिवस उलटून गेलेत. लोकांच्या मनात अमितविषयी हळहळ जाणवतेच आहे. बिहारात शोभावे याप्रमाणे गुंडांनी भरदिवसा एका तरुणाला मारून टाकले. प्रशासनाचा कुठलाही धाक नसल्याचाच तो पुरावा होता. रयतेची अशी दशा होते नि शासनाला विचारपूसही करावीशी वाटत नाही. हीच का लोकशाही? हेच का पालकत्त्व? हेच का शासन, असे सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. ना. प्रवीण पोटे आणि खासदार आनंदराव अडसूळ यांनी बटाऊवाले यांच्याकडे अद्यापही भेट न दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आमदारांनी बटाऊवाले यांच्या घरी भेट दिली होती.