शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

अडगावात आज गोविंदगीर महाराजांची यात्रा

By admin | Updated: September 13, 2015 00:10 IST

अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते.

पोेळा : करीच्या दिवशीही मांसाहार वर्ज्य!अंजनगाव सुर्जी : अंजनगाव- अकोट मार्गावरील अडगाव खाडे या गावात पोळ्याच्या करीच्या दिवशी गोविंदगीर महाराजांची यात्रा भरते. पाच पिढ्यांचा वारसा असलेली ही यात्रा ऐतिहासिक आहे. त्याचप्रमाणे यात्रेतून ग्रामदैवताविषयी गावकऱ्यांची गाढ श्रध्दा प्रकट करणारीदेखील आहे. लोककथेनुसार अंदाजे पाच पिढ्यांपूर्वी वाराणसी (काशी) येथून अडगावात पोहोचलेल्या गोेविंदगीर गोसावी यांनी गावाशेजारच्या गायमुख नदीच्या तिरावर झोपडी बांधून तप साधनेत आयुष्य घालविले व तेथेच समाधी घेतली. नवनाथ परंपरेतील कानिफनाथांच्या पंढरपूर येथील आश्रमात साठीतले गोविंदगीर राहात होते. त्यावेळी त्यांना तिर्थयात्रेची ईच्छा झाली. भटकंतीदरम्यान ते प्रथम अकोट तालुक्यात आले व तेथून अडगाव खाडे येथे आले. गावातील मासूमशहा फकीर त्यांना भेटला. दोघांची गळाभेट झाली व गोविंदगिरांनी येथेच राहण्याचा निश्चय केला.गायमुख नदीच्या शेजारी दाट शिंदीच्या वनात झोपडी बांधून ते राहू लागले. काही दुष्टांनी त्यांना त्रासही दिला. पण, अनेक गावकऱ्यांना त्यांच्या कृपाप्रसादाची अनुभूती झाल्यामुळे गोविंदगीर महाराजांची कीर्ती पसरली. गावातले अनकाजी खाडे हे निपुत्रिक होते. त्यांना गोविंदगीरांनी कुबडी देऊन शेजारच्या झाडावरील आंबा पाडायला लावला. तो प्रसाद खाऊन अनकाजीला पुुत्रप्राप्ती झाली. तेव्हापासून त्यांनी या यात्रेची प्रथा सुरु केली. आपल्या हयातीत गोविंदगीरांचे अनेक चमत्कार गावकऱ्यांना अनुभवण्यास मिळाले. वरुड जऊळक्याचा नथ्थू बाभूळकर, वडाळीचा देशमुख, मुंबईची वृध्द मारवाडी महिला, तेलखेडचे सदाशिव पाटील, हातुर्ण्याचा पुंडलिक म्हाली, कापूसतळणीची सरुबाई, मांगरुळचा कुंभार, पुण्याचा ब्राह्मण आदी अनेकांना महाराजांनी व्याधीमुक्त केल्याच्या लोककथा आहेत. गावातील जुन्या पिढीतले देवराव खाडे यांना दृष्टांत देऊन महाराजांच्या समाधीचा शोध लागला. तो दिवस भाद्रपद शुध्द प्रथमेचा होता. याच दिवसापासून महाराजांची जयंती साजरी करण्याची प्रथा पडली. कालांतराने गावात मंदीर तयार झाले. यात्रेच्या दिवशी अडगाव खाडे गावात दिवाळी अवतरते. पोळ्याच्या रात्रीपासूनच जयंतीची तयारी सुरु होते. रात्रभर चाललेल्या भजनांसह एका विशेष विधीने ३० आयुर्वेदिक वनस्पतींना दगडी खलबत्यांमध्ये कुटून धुनीचे साहित्य बनविण्यात येते. या साहित्याची धुनी जयंतीच्या दिवशी मंत्रोच्चारात पेटविली जाते आणि गावात पालखीसोबत फिरविली जाते. यावेळी पाच भक्त गावाबाहेर जाऊन बारा गावांच्या वेशीची पूजा करतात. यामुळे गावावरचे संकट टळते, अशी गावकऱ्यांची श्रध्दा आहे. यात्रेत दर्शनासह महाप्रसादाचा आनंद घेण्यात येतो. गोविंदगीर महाराजांवर गावकऱ्यांची एवढी श्रध्दा आहे की, करीचा दिवस असूनही अख्खे गाव मांसाहारापासून अलीप्त राहतात. आपल्या दैवताप्रती श्रध्दा प्रकट करण्याचा हा निश्चय आगळा वेगळा आणि विलक्षण आहे.