शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

१०० ग्रॅम बियाण्यांपासून दोन किलो चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 00:52 IST

चाराटंचाईवर मात करण्यासाठी अभिनव प्रयोग धामणगावात यशस्वी ठरला असून, ५० ग्रॅम गहू आणि ५० ग्रॅम मका बियाण्यापासून दोन किलो हिरवा चारा निर्माण करण्याची किमया धामणगाव येथील एका प्राध्यापकाने साधली आहे.

मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : चाराटंचाईवर मात करण्यासाठी अभिनव प्रयोग धामणगावात यशस्वी ठरला असून, ५० ग्रॅम गहू आणि ५० ग्रॅम मका बियाण्यापासून दोन किलो हिरवा चारा निर्माण करण्याची किमया धामणगाव येथील एका प्राध्यापकाने साधली आहे. त्यांच्या प्रयोगाने दुष्काळाच्या छायेत जगणाऱ्या जनावरांसाठी संजीवनी मिळाली आहे.अमृत गड्डमवार (३९) असे या संशोधकाचे नाव आहे. ते धामणगाव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनाचे नाव ‘नॉवेल आॅरगॅनिक मल्टिपल क्रॉप सिस्टीम’ आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित अविष्कार स्पर्धेत त्यांनी तो सादर केला. प्राध्यापक गटातून त्याची निवड गोंडवाणा विद्यापीठात होणाºया राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेसाठी झाली.प्रयोगशील संशोधकअमृत गड्डमवार हे धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागप्रमुख आहेत. त्यांच्या नावे सात पेटेंट असून, विविध देशांतील प्रकाशकांकडून त्यांची सात पुस्तके प्र्रकाशित झाली. विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत त्यांनी चार पुरस्कार पटकावले असून, तीनदा राज्य पातळीवर प्रतिनिधित्व केले आहे.आठ ते दहा दिवसांत चाराबियाणे व ट्रे यांची जुळवणी करण्यापासून एक ते दीड फुटांची रोपे मिळविण्यापर्यंत आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो. फक्त मका वा नुसता गहू या एकवर्णी बियाण्याचा वापर न करता दोन्ही पिकांतील सकस घटक जनावरांना मिंळावेत, हा हेतू असल्याचे गड्डमवार यांनी सांगितले.धामणगावच्या प्राध्यापकाची किमया : मातीविना पिकविले वैरण, जनावरांसाठी संजीवनीअशी झाली चारानिर्मितीसाध्या ट्रेला हवा आरपार जाण्यासाठी प्रथम काही छिद्रे पाडून घेतली. आठ ते दहा तास भिजविलेला गहू व मका ५० प्रत्येकी ५० ग्रॅम घेऊन त्यावर पसरविला. ओल्या गोणपाटाने ४८ तास झाकले. तीन दिवसानंतर कोंब आलेल्या या चाºयाच्या वाढीसाठी त्यावर सतत पाण्याचा स्प्रे केला. पाचव्या दिवसापासून डायल्यूट अमिनो आम्ल पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे करण्यात आला. त्यामुळे आठ ते दहा दिवसांत एक ते दीड फूट उंच चारा तयार झाला.अमिनो आम्लाचा वापरअमिनो आम्ल हे पिकांच्या अभिवृद्धीकरिता योग्य घटक आहे. हे अमिनो आम्ल अमृत गड्डमवार यांनी केसांपासून मिळविले; मात्र त्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी त्यांना द्यावा लागला. एकूण २० प्रकारांपैकी केसात १७ प्रकारचे अमिनो आम्ल असतात. ते पिकांकरिता वेगवेगळे कार्य करतात.सध्या हिरव्या चाऱ्याचे भाव १० रुपये प्रतिकिलो आहे. त्यापेक्षाही कमी पैशात चारा तयार होऊ शकतो. शेतकऱ्यांचा त्यांच्या जनावरांच्या संख्येनुसार मोठ्या प्रमाणात चारानिर्मिती करावयाची असल्यास ड्रिपमध्ये टायमर सेट करून हा प्रयोग यशस्वी करता येईल.- अमृत गड्डमवार,प्राध्यापक, धामणगाव रेल्वे