शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा

By admin | Updated: May 11, 2014 22:12 IST

ऑटोरिक्षा जप्त

अकोला : एकाच क्रमांकांचे दोन ऑटोरिक्षा शहरात धावत असल्याचा प्रकार रविवारी मध्यवर्ती बस स्थानकासमोर उजेडात आला. या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी एक ऑटोरिक्षा जप्त केला असून, चौकशी सुरू केली आहे. जुने शहरात राहणारे प्रभाकर दखणे यांचा एमएस-३०- इ-८९५ या क्रमांकाचा ऑटोरिक्षा आहे. त्यांच्याकडे ऑटोरिक्षाचे दस्तावेजही आहेत. काही दिवसांपूर्वी दखणे यांना एमएच-३०-इ-८९५ या क्रमांकाच्या दुसर्‍या ऑटोरिक्षातून शहरात प्रवासी वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यांनी ऑटोरिक्षा चालकाला हटकले. मात्र चालक तेथून पसार झाला. त्यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्यांना ही बाब वाहतूक पोलिसांना सांगण्यास सांगितले. दरम्यान, रविवारी दखणे यांना मध्यवर्ती बस स्थानकासमोर पुन्हा त्याच क्रमांकाचा ऑटोरिक्षा दिसला. त्यांनी ही बाब वाहतूक पोलिसांना सांगितली. वाहतूक पोलिसांनी सिटी कोतवाली पोलिसांना कळविले. कोतवाली पोलिसांनी दोन्ही ऑटोरिक्षांच्या चालकांची चौकशी केली. दस्तावेज तपासल्यानंतर दखणे यांचा ऑटोरिक्षा सोडून दिला. मात्र दुसर्‍या ऑटोरिक्षाचालक सैय्यद साजिदकडे दस्तावेज नव्हते. दस्तावेज आणून देतो, असे म्हणत त्याने तेथून पळ काढला.