शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

आदिवासींच्या होळीवर आर्थिक संकट

By admin | Updated: March 11, 2017 00:17 IST

मेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो.

विवंचना : रोहयोची मजुरी आणि शेतमालाची रक्कम थकीत, उत्सवावर सावटश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटातील आदिवासी बांधवांसाठी होळीचा सण दिवाळीसारख्या अत्यंत महत्वाचा सण असतो. लहान बालकापासून युवक-युवती व वृद्धांमध्ये या सणाची प्रतीक्षा असते. उपजिविकेसाठी परप्रांतात गेलेले आदिवासी होळीनिमित्त परत आपल्या गावी येतात. आनंद आणि उत्साहात होळी सण कुटुंबांसह साजरा करतात. गेल्या ४-५ वर्षापासून सततची नापिकी आणि दुष्काळी परिस्थिती यावर्षी नसली तरी आपल्या शेतमालास योग्य भाव मिळत नसल्याने व विकलेल्या शेतमालाचे पैसे हातात न पडल्याने यंदाची होळीवरही आर्थिक संकटाने विरजन आणल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे रोजगार हमी योजनेत गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या कामाचाही मोबदला मिळाला नसल्याने होळी सण कसा साजरा करावा, या चिंतेत आदिवासी बांधव सापडला आहे. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या आदिवासींची होळीसाठी शुक्रवारी धारणीत आठवडी बाजारात अत्यल्प हजेरी होती. आदिवासी बांधवांसाठी आपली दुकाने थाटून बसलेले दुकानदार ग्राहकांच्या प्रतिक्षेत बसल्याचे चित्र होते. कपडे, भांडी, मणीयारी, रंग, पिचकारींची दुकानावर गर्दी नव्हती. फक्त बांगळ्या आण बताशे एव्हडेच सामान खरेदी कण्याचे सोपास्कार पार पाडले जात होते. होळीनंतर फगव्याची धूमहोळी जळाल्यानंतर आदिवासी बांधवांचा फगवा उत्सव सुरू होतो. फगवा म्हणजे आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करीत वर्षभर केलेल्या आत्मीय जणांकडून मागितले जाणारे दाम वसुली करण्याची परंपरा आजही जपली जाते. यात रोख रकमेसह वस्तू व धान्याचा समावेश असतो. मात्र, या परंपरेला भीक मागण्याची परंपरा असल्याचे गृहित धरून मागील २० वर्षांपासून आदिवासी समाज विकास संघटनांनी बंदी आणली आहे. त्यामुळे फगवा मागण्याची प्रथा हळूहळू लोप पावत आहे. हिरव्या होळीने साजरा होणार सणमेळघाटातील प्रत्येक गावात होळीच्या दिवशी हिरव्या रंगाची होळी तयार केली जाते. यात जांभुळाची पाने, पळसाची पाने व फुले, तुरीशी तुरकाठी आणि लाकडांचा समावेश असतो. प्रत्येक गावात दोन होळी तयार करण्यात येते. यादिवशी गावातील पोलीस पाटील आपल्या पत्नीसह होळीची पूजा करून होळीला अग्नी देतात.मेघनाथ, कुंभकर्णाची पूजाहोळीनंतर ४ दिवसांनी येणाऱ्या पंचमीच्या दिवशी मेघनाथाची पूजा केली जाते. हा मेघनाथ म्हणजे वरुणदेवता की रामायणातील रावणाचा पुत्र, याबाबत अनेक मतभेद आजही कायम आहेत. मात्र खाऱ्या, टेंभरू या गावात मेघनाथाला लागूनच कुंभकर्णाचीही पूजा पंचमीच्या दिवशी केली जाते. त्यावरून मेघनाथाचा संबंध रामायण काळातील असल्याचे लक्षात येते. मेघनाथाची पूजा तालुक्यातील खाऱ्या टेंभरू, पाटिया, पोटीलावा, कारा, दाबिदा येथे पंचमीच्या दिवशी मोठ्या आनंद व उत्साहाने करण्यात येते.