महापालिका, पोलिसांची संयुक्त कारवाई : मध्यवर्ती चौकात अतिक्रमणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात अतिक्रमण व विदु्रपिकरण करणाऱ्या पारधी बांधवांचे स्थानातंरण महापालिका व पोलीस यांनी संयुक्तरीत्या चालविले आहे. शनिवारी कोतवाली पोलिसांनी दोन गाड्यांमध्ये सुमारे ५० नागरिकांना शहराबाहेर हलविले आहे. शहरात ठिकठिकाणी पारधी बांधवांनी अतिक्रमण करून राहुटी थाटली आहे. राजकमल, सायंस्कोर मैदान, बसस्थानकाशेजारील परिसरात अशा काही ठिकाणी पारधी समाजाच्या बांधवांनी जागा अतिक्रमित केल्याचे निदर्शनास आले होते. त्यातच शहरातील मुख्य चौक राजकमल चौकात तर, या नागरिकांनी भिक मागण्याचे प्रमुख केंद्रच बनविले होते. वाहतुकीच्या वर्दळीत वाहनचालकांना भीक मागून वाहतूक विस्कळीत करण्याचे प्रकार चालविले होते. लहान मुलांच्या माध्यमातून हे नागरिक रस्त्यावर भीक मागत असल्यामुळे अपघाताची शक्यता बळावली होती. तसेच नागरिकांनी दिनचर्या उघड्यावर असल्यामुळे राजकमल चौकात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यातच ये-जा करणाऱ्या वाहनाचालकांना या नागरिकांचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या नागरिकांकडे रहिवासीस्थान असतानाही हे शहरात अतिक्रमण करून राहोट्या थाटत होते. मध्यंतरी सायस्कोर मैदानात पारधी समाजाच्या काही नागरिकांकडून पोलिसांनी अवैध दारुचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे हे नागरिक अवैध व्यवसायाशी जुळले असल्याचे निदर्शनास आले आहे. या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी शहरातील पारधी बांधवांना त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात हलविण्याचे काम पोलीस व महापालिका प्रशासनाने हाती घेतले आहे. शनिवारी मध्यरात्री सांयस्कोर व राजकमल चौकातील पारधी समाजातील नागरिकांना दोन वाहनात बसून शहराबाहेरील त्यांच्या रहिवासी क्षेत्रात हलविण्यात आले आहे. महापालिका व पोलिसांकडून ही संयुुक्त मोहीम राबविण्यात आली. अतिक्रमण करून शहरात राहणाऱ्या पारधी समाजाच्या नागरिकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात नेऊन सोडण्यात आले आहे. - नीलिमा आरज, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे
पारधी समाजाच्या नागरिकांचे स्थानातंरण
By admin | Updated: June 5, 2017 00:07 IST