अमरावती : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध लेखा शीर्षनिहाय सुमारे तीन कोटी रूपयांच्या प्रस्तावित विकास कामांना जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी न मिळाल्याने विकास कामांचा हा निधी आता विधानसभेच्या आचारसंहिते अडकला आहे.जिल्हा नियोजन समितीच्या सभेला मागील जानेवारी महिन्यापासून मुहूर्त गवसला नाही. अशातच जिल्ह्याचे पालकमंत्री बाळकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीची बैठक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार जिल्हा नियोजन समितीची बैठक २६ आॅगस्ट रोजी मुंबईत बोलविली होती मात्र विरोधकांनी या बैठकीवर आक्षेप घेतल्याने ऐनवेळी ही बैठक पालकमंत्र्यांना रद्द करावी लागली होती.आचारसंहितेचाही फटका जिल्हा नियोजन समितीच्या आयोजित करण्यात आलेल्या बैठकांवर दोन्ही वेळा विरोधकांनी आक्षेप घेतल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द झाली. अशातच आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने जिल्हा नियोजन समितीची बैठकीवर विरजन पडले आहे. परिणामी नियोजन करण्यात आलेल्या कामांना सभेची मंजुरी नसल्याने विकास कामातही अडथळा निर्माण झाला आहे.इतरही विकास कामे रखडली जिल्ह्याच्या विकासाठी महत्त्वपूर्ण समिती असलेल्या जिल्हा नियोजन समितीने मागील जानेवारी महिन्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षेखाली पार पडलेल्या सभेत जिल्ह्यातील विविध प्रकारच्या विकास कामांचे नियोजन केले होते. यामध्ये २५/१५ या लेखाशिर्षाअंतर्गत तसेच ५०/ ५४ लेखाशिर्षाअंतर्गत आणि ३०/ ५४ या लेखाशिर्षाअंतर्गत प्रस्तावित कामांवरही जिल्हा नियोजन समितीच्या बैठक न झाल्याचा आणि आचारसंहितेचा फटका बसला आहे.
नियोजन समितीच्या बैठकीअभावी रखडली तीन कोटींची कामे
By admin | Updated: September 16, 2014 23:25 IST