धनगर समाजाचा जिल्हा कचेरीवर मोर्चाधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, मेंढपाळांच्या समस्या निकाली काढव्या या प्रमुख मागण्यांसाठी पावसाच्या जोरदार पावसातही धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना, अहिल्या महिला संघ व कर्मचारी संघटनेच्यावतीने इर्वीन चौक येथून जिल्हा कचेरीवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलनकर्त्यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांना निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू कराव्या, यासाठी अनेकवेळा शासनाला व प्रशासनाला विविध आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देऊन सदर मागणी रेटून धरली. मात्र या मागणीची दखल आघाडी सरकारने घेतली नसल्याने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्यांना आवश्यक सोईसवलती देण्यात याव्या, तसेच मेंढपाळांच्या समस्या निकाली काढव्या, या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष वसंत लवनकर, संतोष महात्मे, उमेश घुरडे, रमेश मातकर यांच्या नेतृत्वात धनगर समाज बांधवांनी मोर्चा काढून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले. दरम्यान सदर मागणीचे निवेदन आरडीसी यांच्याकडे निवेदन सोपविले. यानुसार पुढील कारवाई करण्याचे आश्वासन आरडीसी पवार यांनी दिले. मोर्चामध्ये अमित महात्मे, संजय कापडे, बाळासाहेब अलोने, विजय टुले, बबलू वाडेकर, सोपान महात्मे, बाळासाहेब अवघड, कैलास निंघोट, छबू मातकर, अशोक इसळ, जानराव कोकरे, मेघा बोबडे, सुनंदा पाठक, विद्या ढवळे यांच्यासह धनगर समाज बांधव सहभागी झाल ेहोते. आदिवासी पारधी समाज संघटनेची जिल्हा कचेरीवर धडकआदिवासी पारधी समाज बांधवांना उपजिविकेसाठी कुठलेही साधन नसल्याने या समाजाला उपजिविका करण्यासाठी शासकीय ई-क्लासच्या जमिनी देण्यात याव्या, यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी पारधी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाबुसिंग पवार यांच्या मार्गदर्शनात इर्वीन चौक येथून पारधी समाज बांधवांनी जिल्हाकचेरीवर मोर्चा काढला. आदिवासी पारधी समाजाच्या प्रमुख मागण्यांमध्ये शासकीय ई-क्लास शेतजमिनी वाहिती करणाऱ्यांना शेतजमीन व पिकाचे सर्वेक्षण मिळावे, घरकुल बांधणीसाठी नमुना ८ देण्यात यावा, ५ जुलै २०१४ रोजी बडनेरा येथे झालेल्या अपघातामध्ये मृत्यृमुखी पडलेल्या व जखमींना योग्य न्याय द्यावा, पारधी समाजासाठी असलेल्या पॅकेजची अंमलबजावणी करावी व यासाठी निधी वाढवून देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तेजुसिंग पवार यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केले आहेत. मोर्चात बाबुसिंग पवार, रामदास भोसले, मंगेश भोसले, महिलेस चव्हाण यांच्यासह पारधी समाजबांधव समावेश होता.
भरपावसात आंदोलनाचा धडाका
By admin | Updated: July 15, 2014 23:53 IST