शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

ठाण मांडून बसलेल्यांचीही होणार उचलबांगडी

By admin | Updated: May 9, 2014 00:58 IST

राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे.

अमरावती : राजकीय गॉडफादरचा आसरा घेऊन जिल्हा परिषदेत सोईच्या ठिकाणी विविध विभागात वर्षोगिणती एकाच टेबलावर ठाण मांडून बसलेल्यांची आगामी बदली प्रक्रियेत उचलबांगडी होणार आहे. अशा कर्मचार्‍यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. यासोबतच प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचार्‍यांनाही बदल्यांच्या प्रक्रियेत रडारवर घेतले जाणार असल्याने अशा महाशयाच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत कार्यरत वर्ग ३ आणि ४ च्या कर्मचार्‍यांच्या विनंती, प्रशासकीय बदल्या करण्याबाबतचे आदेश राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने काढले आहे. यानुसार तालुका स्तरापासून येत्या १७ मे रोजी बदल्याची कारवाई सुरु होणार आहे. यासाठी पं.स. आणि जि. प.च्या मुख्यालयातील सर्वच विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. यासाठी बदलीपात्र कर्मचार्‍यांची यादी तयार करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले आहेत. ही प्रक्रिया करत असताना जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत मागील आठ वर्षांपासून एकाच टेबलवर ठाण मांडून काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही फार मोठी आहे. जिल्हा परिषदेतील काही राजकीय नेत्यांच्या साहाय्याने प्रतिनियुक्तीवर विविध कामे सांभाळत असलेले कर्मचारीही कमी नाहीत. दरवर्षी बदल्यांच्या प्रक्रियेत अशा कर्मचार्‍यांपैकी आपली खुर्ची सोईची राहावी, यासाठी माहीर असलेल्यांनी आतापासूनच बचावासाठी प्रयत्न चालविले आहेत. मात्र यावर्षी ठाणबंदी झालेले व प्रतिनियुक्तीवर असलेले सर्वच कर्मचारी बदल्यांमध्ये इतरत्र पाठविले जाणार आहेत. अशांची यादी सर्वच विभागाच्या खातेप्रमुखांकडून मागविली जात आहे. यामुळे मात्र ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)