शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

सुपारी किलरच्या घरांची पोलिसांनी घेतली झडती

By admin | Updated: May 10, 2014 01:16 IST

नंदनवन कॉलनीतील रहिवासी नितीन हिंगासपुरे यांची हत्या करणारे सुपारी किलर समीर ऊर्फ अब्दुल गनी अब्दुल नजीर..

डीएडच्या अभ्यासक्रमाला शिकत होती मेघा बडनेरा : नंदनवन कॉलनीतील रहिवासी नितीन हिंगासपुरे यांची हत्या करणारे सुपारी किलर समीर ऊर्फ अब्दुल गनी अब्दुल नजीर (२६, रा. काजीपुरा, कारंजा लाड), आनंद रमेश गायकवाड (२१) व गजानन महादेव भोंगळे (२0, दोन्ही रा. भारतीपुरा कारंजा लाड) यांच्या कारंजा येथील घरांची पोलिसांनी गुरुवारी झडती घेतली. परंतु त्यांना आरोपीच्या घरुन काहीही मिळाले नाही.नितीन हिंगासपुरे यांची हत्या करण्याप्रकरणी पोलिसांनी नितीनची चुलत वहिनी मेघा हिंगासपुरे, समीर ऊर्फ अब्दुल गनी, आनंद गायकवाड, गजानन भोंगळे व मेघाचा मामा सूरज गुल्हाने या पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीची संख्या ही पाचच असून यामध्ये अटकेतील आरोपी व्यतिरिक्त इतर कोणाचाही सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ऑटो चालक हा घटनेचा प्रत्याक्षदश्री साक्षीदार असल्याने पोलीसांनी त्याचे बयान नोंदवीले आहे.पोलिसांनी दोन मेमरी कार्ड जप्त केले आहे. यापैकी एका कार्डमध्ये नितीन ने मेघाचे काढलेले फोटो असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)■ मेघाचे माहेरचे आडनाव हे बिच्छुते आहे. तिचे माहेर नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील आहे. सात वर्षांपूर्वी तिचा विवाह शाम हिंगासपुरेसोबत झाला आहे. तिला पाच वर्षे व अडीच वर्षाच्या दोन मुली आहेत. मेघा अमरावतीत डी.एड. करीत होती.मेघाच्या भावाचे मोठे राजकीय कनेक्शन■ मेघाला आई - वडील व दोन भाऊ आहेत. यापैकी तिचा एक भाऊ हा नागपूर येथील एका मोठय़ा पुढार्‍यासोबत राहत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली.मेघाची शनिवारी न्यायालयात पेशी■ मेघा हिंगासपुरेची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला शनिवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.