शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

तारा निखळला

By admin | Updated: July 26, 2015 00:38 IST

राष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठसा उमटविणाऱ्या या चाणाक्ष बुद्धीच्या अन् संवेदनशील हृदयाच्या विशाल व्यक्तिमत्त्वाचे जाणे तसे अचानक नव्हतेच. ...

- अन् वसंतदादांनाही दिली मातरामचंद्र सूर्यभान गवई उपाख्य दादासाहेब अर्थात 'निळ्या आसमंता'तील चकाकता ताराच. राष्ट्रीय राजकारणात प्रभावी ठसा उमटविणाऱ्या या चाणाक्ष बुद्धीच्या अन् संवेदनशील हृदयाच्या विशाल व्यक्तिमत्त्वाचे जाणे तसे अचानक नव्हतेच. तरीही त्यांच्या चाहत्यांमध्ये देशभरात उमटलेली शोककळा दादासांहेबांच्या माणूसपणाची उंची अधोरेखित करून जाते. अंबानगरीचे वैभव ठरलेल्या दादासाहेबांना ही भावपूर्ण शब्दांजली...१९७८ सालच्या निवडणुकीनंतर एस काँग्रेस अणि इंदिरा काँग्रेसच्या युतीचे सरकार आले. एस काँग्रेसच्या वाट्याला स्पिकर आणि इंदिरा काँग्रेसच्या वाट्याला चेअरमनपद आले. विधानसभेचे सभापती वि.स. पागे हे निवृत्त झाले होते. इंदिरा काँग्रेसचे सभापतीपदाचे उमेदवार टी.जी.देशमुख नागपूरच्या स्थानिक स्वराज्य संघातून निवडणूक लढवत होते. दहा वर्षे उपसभापतीपदी राहिल्यानंतर नव्याने होणाऱ्या सभापतीच्या अखत्यारित काम करण्याबाबत गवर्इंच्या मनात खंत होतीच. त्यातच गवर्इंशी चर्चेविनाच वसंतदादा पाटील, नाशिकराव तिरपुडे, रामराव आदिक यांनी टी.जी. देशमुख यांना सभापती करण्याचा निर्णय घेतला होता. गवई मौन पाळून होते. विधिमंडळाचे सत्र पंधरा दिवसांवर आले होते. गवई यांनी विधीमंडळाचे सचिव नांदे यांना दालनात बोलावून सांगितले. ‘सभापतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवा’. नांदे म्हणाले, ‘सर यासंबंधी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन कार्यक्रम ठरवावा, अशी प्रथा आहे.’ नांदे यांना गवई म्हणाले, ‘सभापतीपदाची निवडणूक हा सभापतीच्या अखत्यारितला भाग आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची गरज नाही. नांदे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याकरिता टाळाटाळ करीत होते. तीन दिवसानंतर गवई यंनी सचिवांना पुन्हा ११ वाजता दालनात बोलावले आणि सांगितले. ‘तीन वाजेपर्यंत सभापतींच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची फाईल माझ्या सहीकरिता यायलाच हवी. असे घडले नाही तर आपणास माहिती आहे की, मी उपसभापती असलो तरी आज कार्यकारी सभापती आहे. फाईल दोन वाजताच गवई यांच्याकडे आली. गवर्इंनी सत्रात होणाऱ्या सभापतीपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित करुन सही करुन ती फाईल मुख्यमंत्री वसंतदादा यांच्याकडे पाठविली. वसंतदादांची फाईलवर सही होईल, अशी व्यवस्था गवर्इंनी केलीच होती. वसंतदादाची सही झाली. त्यानंतर ही फाईल राज्यपालांच्या सहीकरिता गेली. राज्यपालांची सही झाली आणि फाईल गवर्इंच्या कार्यालयात परत आली. निवडणुकीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आणि हा कार्यक्रम पोस्टाने सर्व सदस्यांना कळविण्यात आला. गवर्इंनी उत्तमराव पाटील यांची मध्यस्थी वापरुन रामजीवन चौधरी यांचा सभापतीपदाकरिता उमेदवारी अर्जही भरुन घेतला. वसंतदादांना हे समजलं तेव्हा ते गवर्इंना म्हणाले, आमचे उमेदवार पी.जी. देशमुख हे आहेत. नागपूर स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून विधान परिषद सदस्यत्त्वाकरिता उभे असलेले पी.जी. देशमुख यांच्या निवडणुकीची तारीख सभापतीपदाच्या निवडणुकीनंतरची आहे. या तारखेला ते सभापतीपदाचा अर्ज कसा भरणार? गवई वसंतदादांना म्हणाले, ‘या बाबीची मला तुम्ही मुळीच जाणीव करुन दिली नाही. सभापतीपदाची निवडणूक हा विधानपरषिदेच्या कामकाजाचा भाग आहे. कार्यकारी सभापती म्हणून मी या निवडणुकीचा कार्यक्रम ठरवला. त्यावर जशी माझी सही आहे तशीच मुख्यमंत्री म्हणून आपणही सही केली आहे. वसंतदादा म्हणाले, आमच्यासमोर अनेक फायली येतात. गठ्ठ्यातल्या फाईलीत सही झाली असेल. आता यावर उपाय काय? गवई म्हणाले, राज्यपाल निवडणुकीचा कार्यक्रम बदलवूू शकतात. वसंतदादा आणि गवई त्यावेळेचे राज्यपाल सादिक अली यांच्याकडे गेलेत. राज्यपालांनी गवर्इंना विचारले ‘काय स्थिती आहे? मी निवडणुकीची तारीख निश्चित केली. मुख्यमंत्र्यांची व आपली सही झाली. रामजीवन चौधरी यांनी सभापतीपदाकरिता अर्जही भरला. म्हणजेच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. आता निवडणूक पुढे ढकलणे हे औचित्याचे नाही. थोड्याबहुत अंतराने नियमबाह्य ठरेल. परंतु राज्यपाल म्हणून आपण हे करु शकता. राज्यपालांनी विचारलं, तसे पत्र आपण मला लिहू शकाल काय? गवई राज्यपालांना नम्रपणे म्हणाले, अशा माझ्या पत्राची नोंद पुढे मागे कुणी वाचली तर कर्तव्यच्युत कार्यकारी सभापती म्हणून होईल. म्हणून मी असे पत्र लिहू शकत नाही. पण आपण जर मला लिहिले तर मात्र मी त्याचा अंमल करीन. राज्यपाल म्हणाले, याक्षणी ढवळाढवळ करणे शक्य नाही. निवडणूक घेणेच योग्य ठरेल. सभापतींच्या निवडणुकीकरिता अर्ज भरण्याची शेवटची तारीख दुसऱ्या दिवसावर असताना गवई यांनी उपसभापतीपदाचा राजीनामा दिला. वसंतदादांनी गवर्इंना बोलावून घेतले आणि म्हणाले, तुम्ही राजीनामा कसा दिलात? गवई म्हणाले, गेल्या एक-दोन दिवातल्या घटना ह्या माझ्या दृष्टीने मानभंग करणाऱ्या ठरल्या. आपण राज्यपालांना सांगून प्रोव्हिजनल टेंपररी चेअरमन नेमा. प्रो.टे. चेअरमन सभापतींची निवडणूक घेतील. टी.जी. देशमुख नसले तरी आपणा सर्वांना हवा असलेला उमेदवार सभापती होईल. मी मात्र दहावर्ष उपसभापती राहून व्हावयाच्या नवीन सभापतीच्या अधिपत्याखाली काम करणार नाही. रात्री वसंतदादा, तिरपुडे, रामराव आदीक आदींची माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे बैठक झाली. मध्यरात्री रा. सू. गवई यांना नाईकांनी बोलावून घेतले आणि आदेश दिला की, उमेदवारी अर्ज भर आणि सभापती हो. रामजीवन चौधरी यांनी अर्ज मागे घेतला आणि गवर्इंची अविरोध सभापती म्हणून निवड झाली.(कृतार्थ जीवन श्री रा.सू. गवई व्यक्ती आणि कार्य या ग्रंथावरुन साभार)