शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
3
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
4
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
5
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
6
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
7
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
8
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
9
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
10
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
11
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
12
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
13
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
14
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
15
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
16
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
17
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
18
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
19
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
20
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार

सोंड्याटोला प्रकल्पाचे विद्युत देयक शेतकऱ्यांच्या मानगुटीवर

By admin | Updated: February 29, 2016 00:19 IST

थकीत वीज देयकामुळे गेल्या वर्षात महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

प्रकल्पाचे भवितव्य अंधारात : पाणीपट्टी, उपकर, विद्युत देयक लागूरंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा) : थकीत वीज देयकामुळे गेल्या वर्षात महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. या वीज देयकाची थकबाकी वसुली शेतकऱ्यांचे मानगुटीवर ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाचे भवितव्य अंधारात जाणार आहे.विदर्भ विधानिक विकास महामंडळाच्या नियंत्रणात असणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पस्थळात यंदा खरीप हंगामात बावनथडी नदी पात्रातून पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. महिनाभर प्रकल्पस्थळात पंपगृह सुरु ठेवण्यात आले आहे. पावसाचे अल्प प्रमाण असताना प्रकल्पाने पाण्याचा उपसा केल्याने सिहोरा परिसरातील शेतकरी तरले आहेत. जलाशयात ८ फुट पाणी असताना प्रकल्पाने पाण्याचा उपसा केल्याने ३२ फुट पाणी साठवणूक करणे पर्यंत मजल मारण्यात आली आहे. यामुळे १४ हजार हेक्टर आर शेतीत खरीप हंगामात पाणी वाटप करण्यात आले आहे. याच कालावधीत ३४ लाख रुपयाचे विजेचे देयकांची थकबाकी असल्याचे कारणावरून महत्वाकांक्षी प्रकल्पाचा महावितरणने वीज पुरवठा खंडीत केला आहे. यामुळे महिनाभरापूर्वीच प्रकल्पस्थळातील पंपगृह बंद झाल्याने नदी पात्रात विना उपयोग पाण्याचा विसर्ग झाला आहे. या आधीपासूनच थकीत विजेचे बिल देयक करण्याची जबाबदारी विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात होती. यामुळे टेंशनमुक्त वातावरणात शेतकऱ्यांना पाणी मिळाले आहे. दरम्यान आता ही जबाबदारी शेतकऱ्यांचे मानगुटीवर देण्यात आली आहे. खरीप हंगामात पाणी वाटप करण्यात आल्याने पाणीपट्टी कर जिल्हा परिषदेचे २० टक्के उपकर व थकबाकी असणारे विजेचे देयक वसुलीची अट लागू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा कर जि.प.च्या तिजोरीतपाटबंधारे विभागाने खरीप हंगामातील पाणीपट्टी कराची वसुली सुरु केली आहे. ही वसुली रास्त आहे. परंतु या वसुलीसोबत स्थानिक उपकरांची वसुली करण्यात येत आहे.यात २० टक्के कराची वसुलीची अट लागू करण्यात आली आहे. १९७६ पासून शेतकऱ्यांची श्रम व परिश्रमाची राशी जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होत आहे. शासन स्तरावर हा निधी वळता करण्यात येत आहे. परंतु संकटात शेतकरी असतांना जि.प. यंत्रणा शेतकऱ्यांचे मदतीला धावून येत नाही. हा निधी वसुल करण्यात येत असल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर आहे.पाणीपट्टी, उपकर व अन्य करांचा भरणा शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सोंड्याटोला प्रकल्पाची भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी आता शेतकऱ्यांनी असल्याने सहकार्याची अपेक्षा आहे.- वाईन देशकर, शाखा अभियंता डावा कालवा, सिहोरा.उद्योगपतींचे कर्ज शासन माफ करीत आहे. त्यांना थकबाकी व वाढता कर्ज असताना सुट दिली जात आहे. परंतु शेतकऱ्यांना तारणाऱ्या प्रकल्पाचे थकीत वीज देयक देण्यासाठी शासनाच्या तिजोरीत साधे ३४ लाख रुपये नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे नियोजन शून्यतेमुळे शेतकऱ्यांना फटका बसला आहे.- मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ