शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

कोमल म्हणते, कर्करोगच माझा ‘व्हॅलेंटाईन’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2016 23:58 IST

किशोरावस्था ओलांडून तारूण्यात पदार्पण करण्याचे तिचे वय. मोरपंखी दिवस...स्वप्नात हरवून जाण्याचे...स्वप्नातला राजकुमार शोधण्याचे..

१० वर्षांपासून दररोज मृत्यूशी सामना : हट्टाने लढतेय जगण्याची लढाई अमरावती : किशोरावस्था ओलांडून तारूण्यात पदार्पण करण्याचे तिचे वय. मोरपंखी दिवस...स्वप्नात हरवून जाण्याचे...स्वप्नातला राजकुमार शोधण्याचे...पण, अवघ्या १२ व्या वर्षी ‘तिच्या’ सोबतीला आला रक्ताचा कर्करोेग. नुसते नाव ऐकूनही गलितगात्र व्हावे, असा याचा धाक. पण, किशोरावस्थेपासून सोबतीला आलेल्या या 'कॅन्सर'ने तिचा हात घट्ट धरून ठेवलाय. आज ती २२ वर्षांची आहे. पण, आता हा भयंकर आजारच तिचा व्हॅलेंटाईन झालाय. ती म्हणते अखेरपर्यंत सोबत करणारी व्यक्ती म्हणजेच खराखुरा व्हॅलेंटाईन ना! मग, ‘या ब्लड कँसर’पेक्षा माझा अधिक जिवलग कोण असू शकतोे? रक्ताच्या 'कॅन्सर'शी १० वर्षांपासून अखंड लढा देणाऱ्या वीरांगना ‘कोमल’ची ही कहाणी जशी हृदयस्पर्शी आहे तशीच प्रेरणादायी देखील. स्वत:च्या लहान-सहान दु:खांना कुरवाळून, त्यांचा बाऊ करून सहानुभूती मिळविणारे अनेक असतात. पण, दररोज मृत्यूशी दोन हात करून हसतमुखाने असह्य वेदना, दु:ख आणि त्यापाठोपाठ येणाऱ्या अनेक क्लेशांचा सामना करणाऱ्या कॅन्सरग्रस्त कोमलसारखे विरळेच. म्हणूनच या शुरांगनेसाठी समाजाचा एक घटक म्हणून आपण काही तरी करावे. तिच्या वेदना काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न तिच्या समवेत अनोखा 'व्हॅलेंटाईन डे' साजरा करूनही आपण करू शकतो ना! प्रेमदिनाची ही अनोेखी भेट नक्कीच कोमलसाठी आल्हाददायक ठरेल. कोमल म्हणते, जेव्हा एक-एक श्वास उसने घेऊन जगावे लागते ना, तेव्हाच जीवनाची खरी किंमत कळते.हॉस्पिटलच तिचे घरअमरावती : आतापर्यंत तिच्या चार किमोथेरपी झाल्या आहेत. किमोथेरपीचे उपचार म्हणजे जिवघेणी प्रक्रिया. जिवंतपणी मरणयातना भोगाव्या लागतात. पण, कोमल लढते आहे. मागील १० वर्षांपासून टाटा कॅन्सर हॉस्पिटल हे तिचे दुसरे घर झाले आहे. वेदनांनीही तिच्यापुढे हात टेकलेत. कोमलच्या लढाईत ‘प्रयास सेवांकुर’ने येणारा व्हॅलेंटाईन डे ‘मानव प्रेमदिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. प्रेमदिनी शहरातील प्रमुख चौकांत सकाळी ९ ते १ यादरम्यान घराघरांतील रद्दी संकलन करून त्यातून येणारी रक्कम कोमलला प्रदान केली जाणार आहे. कोमलचा लढा सर्वांचा व्हावा हा यामागील उद्देश. सर्वांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अविनाश सावजी यांनी केले आहे.कर्करोगाला रोखून शिक्षणाचा वसाकर्करोगाशी एकहाती लढाई करणारी कोमल शिक्षणातही अव्वल आहे. दहावीत ८४ टक्के, बारावीत ८० टक्के आणि बीएससी चवथ्या सेमिस्टरमध्ये विद्यापीठात ती अव्वल आली आहे. सध्या ती बीएससीच्या अंतिम वर्षाला शिकतेय. तोंडात बोट घालावे, असा तिच्या प्रगतीचा आलेख आहे.मी जगणार अन् कॅन्सरतज्ज्ञ होणार!कोमल म्हणते, या लढाईत मी एकटी नाही. अनेकांनी जगण्याचे बळ दिले. वाचन, लिखाण, कथा, कवितांनी प्रेरणा दिली. आता तर मला जगायचेच आहे. मी डॉक्टर होणार आणि कॅन्सरने बाधित माझ्यासारख्या इतरांना नवजीवन देणार. हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे.