जिल्हाधिकारी : जे.डी.पाटील महाविद्यालयात कार्यक्रम दर्यापूर : जीवनाचा मार्ग निश्चित केल्यानंतरच स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडा आणि त्यासाठी स्वत:ला झोकून द्या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. स्थानिक गाडगेबाबा मंडळ व जे.डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्पर्धा परीक्षा यशप्राप्त व्यक्तिंचे अनुभव’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमात ते बोलत होते.अध्यस्थानी दिनकर गायगोले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रामेश्वर भिसे, उपविभागीय अधिकारी विजय राठोड, तहसीलदार राहुल तायडे यांची उपस्थिती होंती. विद्यार्थ्यांना येणाऱ्या सर्व अडचणींवर यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. जे.डी. पाटील महाविद्यलयात संत गाडगेबाबा मंडळाच्यावतीने वर्षभर महिन्याच्या दर दुसऱ्या व चौथ्या शनिवारी देशभरातील यशस्वी व्यक्तिंचे मार्गदर्शन लाभणार आहे. याची सुरूवात शासकीय पीएसआय ट्रेनिंग सेंटरचे संचालक मुरलीधर वाडेकर यांनी केली आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन भारसाकळे, संचालन नरेंद्र माने, तर आभार प्रदर्शन स्पर्धा परीक्षा समन्वयक येलकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)
दिशा निश्चितीनंतरच स्पर्धा परीक्षेची निवड करा
By admin | Updated: January 14, 2017 00:16 IST