लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : हमालपुऱ्यातील प्रगती सॉ मिलला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग विझविण्यात निर्माणाधीन रस्त्यांचा अडसर निर्माण झाला. घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनच्या वाहनांना कसरत करावी लागली. पाच मिनिटांऐवजी १५ ते २० मिनिटे लागली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.गुरदीपसिंग बग्गा यांच्या हमालपुºयातील प्रगती सॉ मिलला आग लागल्याची माहिती रवींद्रसिंग सलुजा यांनी फोनवर सकाळी १०.३५ वाजता अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमनने तात्काळ पाण्याचे बंब घटनास्थळी रवाना केले. तथापि, अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असणाºया घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनला कसरत करावी लागली. रेल्वेस्थानक चौकाकडून रुक्मिणीनगरला जाणाºया मार्गाने वाहने हमालपुºयाकडे निघाली होती. रस्ता निर्माणाधीन असल्याने तो मार्गे बंद आहे. यामुळे वाहनांना परत येऊन बेलपुरा मार्ग हमालपुºयाकडे जावे लागले.अरुंद मार्ग व वर्दळीच्या रस्त्यावरून घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमन वाहनांना कसरत करावी लागली. त्याचप्रमाणे काही वाहने गर्ल्स हायस्कूल चौकातून बसस्थानक व त्यानंतर रुक्मिणीनगर मार्गे हमालपुºयापर्यंत पोहोचावे लागले. त्यामुळे आगीच्या घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनला १५ ते २० मिनिटे लागली.अग्निशमनच्या पाच बंबांनी दोन तास पाण्याचा सतत मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, त्यापूर्वी सॉ मिलमधील लाखोंचा लाकूडफाटा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनात फायरमन इंगोले, उताणे, चौखंडे, वरखडे, दरगाल, हिवराळे, पालवे, सूर्यवंशी, चौधरी यांच्यासह चालक आजने, पंधरे, शेंडे, शोऐब यांनी अथक परिश्रम घेतले.
सॉ मिलला आग; रस्त्याचा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:37 IST
हमालपुऱ्यातील प्रगती सॉ मिलला बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत लाखोंचा मुद्देमाल जळून खाक झाला. आग विझविण्यात निर्माणाधीन रस्त्यांचा अडसर निर्माण झाला. घटनास्थळी पोहोचण्यासाठी अग्निशमनच्या वाहनांना कसरत करावी लागली. पाच मिनिटांऐवजी १५ ते २० मिनिटे लागली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
सॉ मिलला आग; रस्त्याचा खोडा
ठळक मुद्देअनर्थ टळला : दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण