सेवायोजन केंद्रात शुकशुकाट : भरती प्रक्रिया राबविण्याची गरजअमरावती : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये सप्टेंबर २०१५ अखेर ७०,४५४ बेरोजगारांनी नोंद केली. यातील केवळ ४२८ उमेदवारांनी नौकरी मिळविण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे सेवायोजन अर्थात एम्प्लायमेंट कार्ड काढून फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.१०-१२ वर्षापूर्वी १०वीची गुणपत्रिका हाती येताच विद्यार्थी सेवायोजन केंद्राकडे मोर्चा वळवायचे. रांगेत उभे राहून सेवायोजन कार्ड काढायचे. मात्र ही प्रक्रिया आॅनलाईन झाल्याने या कार्यालयामध्ये स्मशान शांतता पसरली आहे. वर्षोगिणती एम्प्लायमेंट कार्यालयाकडून नौकरीचे ‘कॉल’ येत नसल्याने अनेकांनी हे कार्ड काढण्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. शासकीय किंवा खाजगी नौकरीसाठी एम्प्लायमेंट कार्ड आवश्यक बाब होती. मात्र काळानुरुप या कार्डाचे महत्त्व कमी झाले आहे. संगणकाच्या युगात नौकरीची संधी संकेत स्थळावर उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी तथा बेरोजगारांनी एम्प्लायमेंट आॅफीसकडे पाठ फिरविली आहे. अशातच नौकरी उपलब्ध होत नसल्याने कशाला वेळ दवडायचा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आकडा खालवला आहे.सन २०१२ मध्ये ९८,९९४, सन २०१३ मध्ये ९०३८७, सन २०१४ मध्ये १,३६,४३० व सप्टेंबर २०१५ अखेर १,२९, १५० विद्यार्थी बेरोजगारांनी नोंद केली आहे. शासकीय खातेप्रमुख आणि खाजगी कंपन्यापूर्वी सेवायोजन कार्यालयाकडे व्यक्तीची मागणी करायचे, त्यानुसार त्यांना सेवायोजना कार्यालयाकडून बेरोजगारांची नावे पुरविल्या जायची. आता हे काम ६६६.ेंँं१ङ्म्नँ१.ॅङ्म५.्रल्ल या संंकेत स्थळावरुन आॅनलाईन केले जाते. सेवायोजन कार्यालयात लागत असलेल्या रांगा आता कालबाह्य झाल्या आहेत. नुतनीकरण करणे हा विषय सेवायोजनेत केंद्रात संपुष्टात आणला आहे. आता तो उमेदवार केव्हाही, कुठेही लॉगीनने आणि पासवर्ड घेऊ शकतो. (प्रतिनिधी)
नोंदणी ७० हजारांची, नोकरी केवळ ४२८ जणांना
By admin | Updated: October 10, 2015 00:46 IST