शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

चार खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाईची शिफारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:55 IST

कोविड, नॉनकोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी व चाचण्यांकरिता शासनाद्वारे दर निश्चित केले. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी करणे अनिवार्य आहे. आकारणी या दरपत्रकानुसारच होते की कसे, याबाबत तपासणीकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी जिल्हा पथक गठित केले होते. या पथकाद्वारे एमजेपीजेएवाय व पीएमजेएवाय योजनेचे कामदेखील पाहण्यात येते.

ठळक मुद्देजिल्हा पथकाचा अहवाल आयुक्तांकडे, कोरोनात अवास्तव आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी रुग्णांलयाद्वारे कोविड, नॉनकोविड रुग्णालयांची तपासणी करण्यासाठी गठित जिल्हा पथकाने शनिवारी चार खासगी रुग्णालयांना आकस्मिक भेट दिली असता, अवास्तव बिलांच्या आकारणीसह अनेक नियमबाह्य प्रकार पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे महापालिका आयुक्तांना शनिवारी अहवाल सादर करून कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली. कोविड, नॉनकोविड रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये तपासणी व चाचण्यांकरिता शासनाद्वारे दर निश्चित केले. त्यानुसार रुग्णांकडून आकारणी करणे अनिवार्य आहे. आकारणी या दरपत्रकानुसारच होते की कसे, याबाबत तपासणीकरिता जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ सप्टेंबर रोजी जिल्हा पथक गठित केले होते. या पथकाद्वारे एमजेपीजेएवाय व पीएमजेएवाय योजनेचे कामदेखील पाहण्यात येते. उपजिल्हाधिकारी राम लंके, लेखाधिकारी नरेंद्र भटूरकर, जिल्हा समन्वयक सचिन सानप, सहायक विलास घाटे, नितीन पडकुले, राजेश शर्मा यांचा पथकात समावेश आहे. शनिवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार पथकाद्वारे चार खासगी रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांच्या देयकांची नमुना तपासणी  अचानक करण्यात आली. यात मोठ्या प्रमाणात त्रुटी, रुग्णांकडून अवास्तव बिलांची आकारणी व नियमबाह्य कारभार उघडकीस आला. हा अहवाल आयुक्त प्रशांत रोडे यांना शनिवारी सादर करण्यात आला. त्यात कारवाईची  शिफारस करण्यात आली. आता आयुक्त कोणती कारवाई करतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हिलटॉप हॉस्पिटल शासन दरपत्रकाप्रमाणे सिझेरीयन सेक्शन या शस्त्रक्रियेसाठी ५३ हजार प्रतिशस्त्रक्रिया व उपचारासाठी एकरकमी दर निर्धारित केले आहे. मात्र, देयक क्रमांक १४ मध्ये ८६,६०० रुपये नमूद आहे. प्रतिदिन चार हजारांप्रमाणे सहा दिवसांसाठी २४ हजारांची आकारणी केली. दर्शनी भागात दरपत्रक लावले नाही.

रेनबो हॉस्पिटलपीपीई किटच्या दराचा उल्लेख नसलेले जुने जोडपत्र लावलेले पथकाला दिसून आले. रुग्णांकडून ईसीजी, इन्फ्युजन, इंट्युबेशनकरिता  अतिरिक्त दराची आकारणी, काही रुग्णांना आयसीमधून प्रकृती ठीक झाल्यावर आयसोलेशन वाॅर्डात दाखल केल्यानंतरही त्या दिवसांचे सरसकट आयसीयूची आकारणी करण्यात आली.

सिटी मल्टिस्पेशािलिटी हॉस्पिटलवारंवार मागणी करूनही पथकाला बिलबूक दिले नाही. तासाभरानंतर एक बिलबूक दिले. त्यातील २२ पावत्या काढून पुरावा नष्ट केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. सायंकाळी पथक सदस्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून सर्व देयकांच्या प्रिंटआऊट तयार असल्याचे सांगण्यात आल्याचे पथकाच्या अहवालात नमूद आहे.

अंबादेवी कोविड हॉस्पिटलपीपीई कीट व औषधांचे खोके जाळून नष्ट करताना दिसून आले. याशिवाय बिलिंग सेक्शन हा उपचार करण्यात येत असलेल्या वाॅर्डातच कार्यन्वित असल्याचे पथकाला दिसून आले. रुग्णांचे नातेवाईक यांना जनरल वाॅर्डात पाणी व इतर साहित्य देण्यासाठी थेट प्रवेश असल्याचे आढळले.

 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल