पुसलावासीयांनी सोडला सुटकेचा श्वास : तपास सुरुच, तीन पथके धावली चारही दिशांनापुसला : स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोरुन दोन मुलांना निळ्या साडीतील दोन तृतीयपंथीयांनी पोत्यात डांबून पळवून नेल्याची चर्चा गुरूवारी दुपारी साडेतीन वाजता सुरू झाली. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तपासचक्रे फिरविली. बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच सर्व पालकांनी शाळेसमोर गर्दी करुन आपापली मुले सुरक्षित असल्याची शहानिशा करून घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी शोधमोहीम चालविली होती. परंतु अपहरणाची केवळ अफवाच ठरली.नवीन चेहऱ्यांवर नजरपुसला : सुदैवाने असा प्रकार घडला नसल्याने पुसलावासियासह प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. पुसला या गावात १६ ला दुपारी साडे तीन वाजताच्या दरम्यान जिल्हा परिषद पूवर् माध्यमिक शाळे समोरुन निळया रंगाच्या साडीत आलेल्या तृतीय पथीय दोन लोकांनी दोन मुले पोत्यात भरुन नेल्याची माहिती एका बोर विकणाऱ्या वृध्द महिला तसेच ७ व्या वर्गात शिकणाऱ्या विद्याथ्यर्ज्ञंनी शिक्षक तसेच पोलीसांनी दिली होती. लहान मुलांवर विश्वास ठेवून पोलीसांनी सर्वत्र नाकेबंदी केली होती. एवढयावरच न थांबता गावातील सवर् शाळेतील विद्यार्थ्यांना सुटी देवून विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत कुणाचाही मुलगा किंवा मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीसांना मिळाली नाही. तर सवर् शाळेची पटसंख्या आहे तेवढीच होती. आपला मुलगा सुरक्षित अ ाह ेयाची खात्री करण्याकरतीा शाळेसमोर मोठी गर्दी केली होती. मुलांचे अपहरण झाल्याची वार्ता पंचक्रोशीत पसरताच नागरीकांनी एकच गर्दी केली. ठाणेदार अशोक लांडे आपल्या कर्मचाऱ्यांसह रात्री उशिरापर्यंत पुसला येथे तळ ठोकून होते. गावकुसाबाहेरील फिरस्ती कुटूंब, गावात फिरणारे नवीन चेहरे तसेच आजूबाजूने वास्त्वय करणाऱ्यावर शेंदूरजनाघाट पोलीस नजर ठेवून आहे. (वार्ताहर)
तृतीयपंथीयांनी मुले पळवून नेल्याची अफवाच!
By admin | Updated: July 18, 2015 00:07 IST