शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

शहरातील शाळांचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकाऱ्यांच्याच ताब्यात

By admin | Updated: May 9, 2014 01:41 IST

जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांऐवजी महापालिका..

अमरावती : जिल्हा परिषद शाळांसह, इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्व शासकीय व खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनंतर यापुढे जिल्हा परिषद शिक्षणाधिकार्‍यांऐवजी महापालिका क्षेत्रातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार पालिका आयुक्तांना शासनाने बहाल केले आहे. मात्र अद्यापही शहरी भागातील शाळांवर नियंत्रण ठेवण्याचा रिमोट कंट्रोल शिक्षणाधिकारी यांच्याच ताब्यात असल्याने या शाळांवर नियंत्रण कुणाचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.महापालिकेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या जिल्हा परिषद, खासगी अनुदानित, विनाअनुदानित, कनिष्ठ महाविद्यालये आदी शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अशा शाळांचे हस्तांतरण शिक्षण विभागाने महानगर पालिकाकडे केले आहे. शासनाने दिलेल्या आदेशानुसार ही सोपस्काराची कारवाई पूर्ण झाली असताना यासोबतच शासनाने काढलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात मोडणार्‍या सर्व शाळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्याऐवजी महापालिका आयुक्तांकडे सोपविण्याचे स्पष्ट निर्देशही याच आदेशात देण्यात आले आहेत. मात्र जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ज्या शहरातील शाळा महापालिकेकडे हस्तांतरित केल्या आहेत, त्या शाळांवर नियंत्रण ठेवण्याच्या अधिकारांचे अधिकार पत्रच जिल्हा परिषद शिक्षण विभागाने महापालिका आयुक्तांना दिलेले नाही. परिणामी शहरासह ग्रामीण भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार शिक्षणाधिकारी यांनी स्वत:कडे राखून ठेवल्यामुळे शिक्षण विभागाकडे आधीची होती तेवढी जबाबदारी असल्याने कमी होणारा शिक्षण विभागाचा प्रशासकीय ताण कायम आहे. त्यामुळे अद्यापही शिक्षण विभागाची पूर्वीप्रमाणेच कामाची तारांबळ कायम आहे. परिणामी शहरी भागातील शाळांवर नियंत्रणाचे अधिकार महापालिका आयुक्तांना दिल्यास ग्रामीण भागातील शाळांवर योग्यरित्या नियंत्रण ठेवून शिक्षण विभागाला प्रशासकीय कामातील गती वाढविणे सोपे होऊ शकते; मात्र शिक्षणाधिकारी हे आपल्याकडील नियंत्रणाचा वाढलेला भार केव्हा कमी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी) जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत महापालिका क्षेत्रात येणार्‍या शाळा हस्तांतरणाची कार्यवाही केली आहे; मात्र यावर नियंत्रण ठेवण्याबाबत अद्याप तरी पत्र शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेले नाही.- सविता चक्रपाणी, शिक्षणाधिकारी महापालिका, अमरावती