अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतमोजणी होणार असलेल्या नेमाणी गोडाऊन परिसरासह शहरात ठिकठिकाणी ५00 पोलीस कर्मचारी-अधिकार्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. नागरिकांना निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. १६ मे रोजी बडनेरा मार्गावरील नेमाणी गोडाऊन येथे मतमोजणी होईल. यासाठी शहरासह नेमाणी गोडाऊन परिसरात ५00 पोलीस कर्मचारी तैनात असतील. पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात नेमाणी गोडाऊन येथे दोन पोलीस उपायुक्त, दोन सहायक पोलीस आयुक्त, सात पोलीस निरीक्षक, १३ पोलीस उपनिरीक्षक, ४११ कर्मचारी, ४0 महिला कर्मचारी, सीआरपीएफ, राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्या व विजयी मिरवणुकीत १४ पोलीस निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिली. नेमाणी मतमोजणीदरम्यान बडनेरा मतमोजणी
नेमाणी गोडाऊनमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
By admin | Updated: May 12, 2014 23:01 IST