शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘प्लेग’ने उद्ध्वस्त वरूडा उजाडच!

By admin | Updated: December 2, 2015 00:11 IST

येथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते.

शतकानंतरही पालटली नाही कळा : पडक्या भिंती, मंदिरे, विहिरींचे अवशेष शिल्लक अमोल कोहळे  पोहरा बंदीयेथून एक किलोमीटर अंतरावर चहूबाजूंनी नटलेल्या निसर्गसौंदर्यात वरूडा गाव वसलेले होते. सुमारे १०० वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली आणि एकापाठोपाठ एक घराघरांतून माणसे दगावली. संपूर्ण गावाला प्लेगच्या साथीने वेढले होते तेव्हापासून उजाड झालेले हे गाव अद्यापही वसले नाही. या गावाचे इतरत्र कुठे पुनर्वसनही झाले नाही.पोहरापासून जवळच असलेल्या घनदाट जंगल क्षेत्राला उजाड वरूडा म्हणून ओळखले जाते. जेथे आज जंगल आहे तेथे १०० वर्षांपूर्वी गाव वसले होते, याची तेथील काही पुरातन वस्तू साक्षी आहेत. ज्या जागी लोकांचे अस्तित्व होते, ती जागा वृक्षवल्ली प्राण्यांनी व्यापली आहे. पशुपक्षी गोड कंठाने दु:खी वरूडाचा इतिहास सांगत वरूडाच्या जखमेवर फुंकर मारण्याचा जणू प्रयत्न करीत असल्याचा भास निर्माण होतो. १९ व्या शतकात ब्रिटिशांना देशातून परतवून लावण्यासाठी खेड्यात मशाली पेटल्या असताना त्याचवेळी महामारी व व प्लेगसारख्या रोगाने थैमान घालून अनेक गावांना पीडित करून सोडले होते, असे सांगितले जाते. उंदराच्या पाठीवर येणाऱ्या प्लेगच्या साथीला वरूडा गाव बळी पडल्याचे काही जाणकारांनी सांगितले. त्याकाळी प्लेगवर रामबाण औषधी उपलब्ध नव्हती. मग ज्या गावात प्लेग आला तेथील मंडळीला गाव रिकामा केल्याशिवाय पर्याय नसायचा. प्लेगची साथ १०० वर्षांपूर्वी वरूडा गावावर आल्याने येथील माणसांसह पाळीव प्राणीही नष्ट झाले. उजाड वरूडाला भेट दिली असता आजही हे गाव स्वकीयांना हरविल्याबद्दल अश्रू ढाळत असल्याचे जाणवते. गावात थोड्याच अंतरावर पाटलाच्या वाड्याच्या पडक्या भिंती शेवटच्या घटका मोजत आहेत. वाड्यांच्या बाजूला एक मारूतीची मूर्ती उभी आहे. शेजारीच एक विहीर आहे. लोकांच्या सहवासात राहणारा हा हनुमान आजही निवांतपणे उभा असून येथे कधी तरी वरूडा नावाचे गाव होते याची साक्ष देत विराट घनदाट जंगलाचा पहारेदार बनलाय आजूबाजूला जमीनदोस्त झालेल्या घरांचे जोते (पायवे) आढळतात परिसराला वन विभागाने नवीन वनसंरक्षण कुटी तयार केली. आता वरूडा जंगल म्हणून ओळखले जात आहे. येथे उघड्यावर बजरंग बलीच्या मूर्ती आहे. येथे त्यांच्या मृत्यू पश्चात वनविभागाची वनसंरक्षण कुटी उभारण्यात आली आहे. वरूडाच्या या पूर्वेतिहासाबद्दल आजूबाजूच्या गावातील ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा दुजोरा दिला. वन विभागाच्या नोंदीत वरूडा गाव आढळते. बजरंग मूर्ती विहीर व पडक्या अवस्थेतील वाडा वरूडा गावाचा ठोस पुरावा म्हणून समोर येतो. तरोडा, वरूडा, ब्रह्मी, नवसारी ही गावे प्लेगच्या साथीने उजाड झाली होती. त्यावेळी या गावात एकामागे एक जीव मृत्यूमुखी पडत गेले. दिवसभर स्मशानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत खड्डे करावे लागत होते. त्यावेळी या आजारावर कोणताच रामबाण ईलाज उपलब्ध नसल्याने लोक काळजी घेत. प्लेगची साथ पसरल्यानंतर कोणताही नातेवाईक भेटीला सुध्दा येत नसे. उदध्वस्त झालेल्या या गावाचे भाग्य अद्यापही उदयास आले नाही.- मुरलीधर भालकर, (९०, रा. पोहरा बंदी), प्लेग साथीचे साक्षीदार.