अमरावती : सध्या एक किलो आमरसाचे उत्पादन मूल्य ८२ रुपये आहे. आंबा खराब असेल तर हा रस ७५ रुपयांनाही मिळतो; परंतु हा दर आणखी कमी करण्यासाठी आता चक्क पपईचा आधार घेतला जात आहे. पपईचा रस आंबा रसात मिक्स करून तो महागड्या किमतीत ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याची माहिती पुढे आली आहे. पिताना मात्र ग्राहकाला हा रस कसला आहे हे लक्षातच येत नाही. त्यातही धक्कादायक गोष्ट म्हणजे, बऱ्याच वेळा जुन्या बीअरच्या बाटल्या स्वच्छ करून त्यात हा रस भरून ठेवला जातो. काय आहे कॅनिंग?आंबा पिकतो, रस गळतो हे आंब्याचे प्रसिद्ध गाणे प्रचितीला येते ते मे महिन्यामध्ये. आंब्याचा रस काढण्याचे दिवस सुरू होतात. म्हणजेच आंब्याचे कॅनिंग सुरू होते. खरे म्हणजे आंबा कॅनिंग सुरू झाले की, आंबा निर्यातीचे दिवस संपले. आंबा मोसमाचे अखेरचे दिवस सुरू झाले असे समजावे. पुढील मोसमासाठी आंब्याचा रस कॅनमध्ये म्हणजे बाटलीमध्ये साठविण्याच्या प्रक्रियेला कॅनिंग म्हणतात. कॅनिंगसाठी कोणताही आंबा कॅनिंग याच काळात सुरू होते. आंबा कॅनिंगसाठी कोणताही आंबा चालतो. या आंब्याचा दर किलोला १0 रुपयांपासून सुरू होतो. म्हणजे कॅनिंगचा आंबा सुमारे २00 रुपये डझन या दराने खरेदी केला जातो. बऱ्याच जणांचा गैरसमज असा आहे की, आंब्याचा दर विकत घेणारे म्हणजे कॅनिंगवाले ठरवितात. वास्तविक हा दर आंबा रस विकत घेणाऱ्या कंपन्या ठरवितात. यानंतर मोठे एजंट नेमले जातात. जे हा रस काढतात किंवा काढलेला रस पिंपाद्वारे विकत घेतात. मोठे कॅनिंगवाले छोटे-छोटे व्यापारी नेमून ग्राहकांकडून आंबा घेतात. प्रत्येकाचे कमिशन वजा जाता अखेर शेतकऱ्याच्या हातात किलोला १0 रुपये पडतात. या आंब्यामध्ये डागी आंबा, कोवळा आंबा म्हणजेच जो मार्केटमध्ये विकला जाणार नाही, असा आंबा असतो.
मँगो ज्यूसमध्ये पपईचा रस!
By admin | Updated: May 16, 2015 00:44 IST